उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील शेतकरी मेळाव्यात हजेरी लावली. त्यांनी ठेकेदार व पुढाऱ्यांना कामाचा दर्जा राखण्याचे महत्त्व सांगितले. पवारांनी बारामतीसाठी 1000 कोटी रुपयांचे काम मंजूर केल्याचे सांगितले. त्यांनी प्रशासनावर दरारा ठेवून कष्ट करून काम करण्याचे आवाहन केले. पवारांनी संस्थांना चुकीचा डाग लागू देणार नाही असा विश्वास दिला.”मलिदा” गॅंगने मला तर नको नको केलं आहे, तरी त्यांना हौस आहेच. मी शंभरदा सांगितलं, एक तर पुढारपण करा किंवा कॉन्ट्रॅक्टर बना. तुम्ही पुढारी बनणार, माझ्याकडून कामे घेणार आणि कामाचा दर्जा नाही राहिला तर मी पुन्हा अडचणीत येणार. लोकं म्हणतील अजित पवारांना हे दिसत नाही का? या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाऱ्यांसह ठेकेदारांचे कान टोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी बारामती दौऱ्यावर होते.











