धुळ्यात एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. या तरुणाला आर्मीत भरती व्हायचं होतं, पण अवघ्या दोन गुणांनी त्याची संधी हुकली. त्यातून तो नैराश्यात गेला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.भारतीय लष्करात भरती होऊन देशाची सेवा करावी, हे स्वप्न डोळ्यात घेत एका तरुणाने भरतीसाठी परीक्षा दिली. त्याला भारतीय लष्करात भरती व्हायचं होतं. मात्र, या परीक्षेत अवघ्य दोन गुणांनी त्याची हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी हुकली. धुळे तालुक्यातील रामी येथील उच्च शिक्षित तरुण या परीक्षेत अवघ्या दोन गुणांनी मागे पडला. यामुळे त्याला इतकं नैराश्य आलं की त्याने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे.











