आपल्याला कोणी आवडो अगर न आवडो, दादा-भाऊ म्हणून काम करायचं. शिवसेनेत आता जोड्या लावायची सवय लागली आहे, आपली शिवसेना अशी नाहीये हे लक्षात ठेवा, असं शरद सोनवणे म्हणाले.शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतर अपक्ष विधानसभा निवडणूक लढवती विजयी झालेले आमदार शरद सोनवणे (Sharad Sonavane) यांनी शिवसेनेच्या संवाद बैठकीला हजेरी लावली. बारामती लोकसभा मतदारसंघात सर्व सहा मतदारसंघात विजय बापू शिवतारे (Vijay Shivtare) यांनी आपले आमदार निवडून आणले पाहिजेत, असं शरद सोनवणे म्हणाल्याने महायुतीतील अजित पवार यांच्या बारामतीवर शिवसेनेचा डोळा असल्याचे दिसते.मनातला ‘मी’पणा काढून टाका, मला कुठेही बसवा, मला संघटनेचं काम करायचं आहे, असं रवींद्र धंगेकर म्हणाले, याचा मला अभिमान आहे. लोकशाहीत डोकी मोजली जातात, आपण ८० पैकी ६० आमदार निवडून आणले. एकीकडे तीन पक्ष युतीमध्ये आहेत, कोणाकडे किती आमदार, नगरसेवक आहेत हे पाहिले पाहिजे, असं शरद सोनवणे म्हणाले.











