छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर न्यायालयात हल्ला झाला आहे. एका वकिलानं कोरटकरवर हल्ला केला.कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर न्यायालयात हल्ला झाला आहे. एका वकिलानं कोरटकरवर हल्ला केला. अमित भोसले असं वकिलाचं नाव आहे. न्यायालयातील युक्तिवाद संपल्यानंतर पोलीस कोरटकरला कोठडीकडे नेत होते. त्यावेळी वकील अमित भोसले यांनी कोटकरवर हल्ला केला. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का, असा सवाल करत वकिलानं कोरटकरवर झडप घातली.छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी पोलिसांना जवळपास महिना लागला. कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. बुधवारी न्यायालयाच्या आवारातच कोरटकरवर शिवप्रेमींनी हल्ला केला.











