अंडर-१९ क्रिकेट टीममध्ये निवड झालेली, पण नियतीच्या मनात वेगळचं, क्रिकेटरचा दुर्दैवी अंत

अंडर-१९ क्रिकेट टीममधील क्रिकेटरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.एखाद्यासोबत कधी काय घडेल काहीच सांगता येत नाही. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. एका १७ वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लेकाच्या जाण्याने आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.नदीत बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव मानव आहे. बुधवारी संध्याकाळी मानव त्याच्या मित्रांसोबत नदीकिनारी पोहोण्यासाठी गेला होता. मित्रांसोबत मजा-मस्ती करत असताना मानव अचानक नदीतील खोल पाण्यात गेला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने मानव बुडू लागला. मानव बुडत असल्याचं पाहून त्याचा मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो मित्रही बुडू लागला. या परिस्थितीत इतर मित्रांनी आरडाओरड करत मदत मागण्यास सुरुवात केली.

मानवला वाचवण्यासाठी गेलेला मित्र बुडू लागल्याने त्याचा दुसऱ्या एका मित्राने हात पकडला आणि तो थोडक्यात बचावला. पण मानवला वाचवेपर्यंत तो खोलपर्यंत पोहोचला होता. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर तिथे स्थानिक लोक आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं, पण तोपर्यंत मानव बुडाला होता. केरळच्या एर्नाकुलममधील परवूर भागात ही दुर्दैवी घटना घडली.अग्निशमन विभागाच्या स्कूबा टीमने ३० फूट खोल पाण्यात बुडालेल्या मानवला पाण्यातून बाहेर काढलं.

त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून मानवच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.मानव बायोलॉजीचा बारावीचा विद्यार्थी होता. तो क्रिकेटर होता. नुकतंच त्याची केरळच्या अंडर-१९ क्रिकेट टीममध्ये निवड झाली होती. पण हा आनंद तो आणि त्याचे कुटुंबीय फार दिवस साजरा करू शकले नाहीत. मानवच्या अशा जाण्याने त्याच्या केवळ कुटुंबावरच नाही, तर त्याच्या मित्र आणि शिक्षकांमधूनही शोक व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.