बनावट किल्ली बनवली, बुलेट चोरली, वाहतूक चालानमुळे खेळ खल्लास! २४ तासांत चोरटा गजाआड.

नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून बुलेटची चोरी करून पळून गेलेल्या तरुणाला लोहमार्ग पोलिसांनी नाशिक येथून अवघ्या २४ तासात अटक केली. विशेष म्हणजे वाहतूक चालानमुळे या चोरीचा छडा लागला.नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून बुलेटची चोरी करून पळून गेलेल्या तरुणाला लोहमार्गनाशिक येथून अवघ्या २४ तासात अटक केली. विशेष म्हणजे वाहतूक चालानमुळे या चोरीचा छडा लागला. प्रणय मोरे (वय २८, रा. नाशिक) असे या आरोपीचे नाव आहे.रेल्वे स्थानक परिसरातून अनेकदा वाहने चोरीला जातात. एक बुलेट चोरीला गेली होती. लोहमार्ग पोलिसांनी  २४ तासाच्या आत बुलेटसह आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम.एस्सी.ला शिकत असलेल्या प्रवीणला बुलेट बाइकचे कमालीचे आकर्षण आहे. नागपूरला तो एका लग्नासाठी आला असता रेल्वे स्थानकावरील पार्किंगमध्ये त्याला ही बुलेट दिसली. बुलेट मालक २१ मार्च रोजी पार्किगंमध्ये बुलेट ठेवून रेल्वेने उज्जैनला गेले होते. ते २४ तारखेला परत आले त्यावेळी तेथे बुलेट नव्हती.त्यामुळे त्यांनी लोहमार्ग पोलिसात चोरीची तक्रार दिली.

पार्किंगमध्ये दुचाकींचे हँडल लॉक न करताच ठेवले जाते. त्यामुळे आरोपीने बुलेट तेथून काढली व सरळ एका किल्ली बनविणाऱ्याकडे जाऊन नवीन चावी तयार केली व तो निघाला. लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास केला असता वर्धा येथे ही गाडी चालान झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे लोहमार्गचे पुष्पराज मिश्रा, प्रवीण खवसे, मझहर अली हे वर्धा येथे गेले व चालानच्या आधारे तेथील वाहतूक पोलिसांकडे विचारपूस केली असता, चालकाजवळ हेल्मेट नसल्याने चालान केल्याचे त्यांनी सांगितले. याच वाहनाला अकोल्यापुढे बोरगाव मंजू येथे पुन्हा चालान करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांचे पथक तेथे गेले. तेथे हा तरुण नाशिकला गेल्याची माहिती मिळाली.

तेथे नाशिक पोलिसांच्या मदतीने २४ तासाच्या आत बुलेट हस्तगत करून आरोपीला अटक करण्यात आली.ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे, अपर पोलिस अधीक्षक दत्ताराम रठोड, विभागीय पलिस अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनात व पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.