योगींची टिप्पणी म्हणजे ब्लॅक कॉमेडी! हिंदी भाषावादावरुन एमके स्टॅलिन यांचा पलटवार.

 ‘तमिळनाडूचे द्रमुक सरकार भाषेच्या मुद्द्याचा वापर करून फूट पाडण्याचे राजकारण करत आहे,’ असा आरोप आदित्यनाथ यांनी केला होता. त्याला स्टॅलिन यांनी प्रत्युत्तर दिले.हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादावरून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले. ‘त्यांची टिप्पणी ‘राजकीय ब्लॅक कॉमेडी’ आहे,’ असे ते म्हणाले. ‘आमचे राज्य कोणत्याही भाषेला विरोध करत नाही, तर ती लादण्यास आणि वर्चस्ववादाला विरोध करते,’ असे त्यांनी अधोरेखित केले.‘तमिळनाडूचे द्रमुक सरकार भाषेच्या मुद्द्याचा वापर करून फूट पाडण्याचे राजकारण करत आहे,’ असा आरोप आदित्यनाथ यांनी केला होता. त्याला स्टॅलिन यांनी प्रत्युत्तर दिले. ‘द्विभाषा धोरण आणि मतदारसंघांची योग्य फेररचना यावरील तमिळनाडूचा निष्पक्ष आणि ठाम आवाज देशभरात प्रतिध्वनित होत आहे. भारतीय जनता पक्ष याला घाबरत आहे,’ असे स्टॅलिन म्हणाले.

‘आता माननीय योगी आदित्यनाथ आम्हाला द्वेषाबाबत व्याख्यान देणार आहेत का? हे मतांसाठी दंगल घडवण्याचे राजकारण नाही. ही सन्मान आणि न्यायाची लढाई आहे,’ असे त्यांनी ‘एक्स’वर नमूद केले.लोकसभा मतदारसंघ फेररचनेसाठी लोकसंख्या हा एकमेव निकष असू नये, याबाबतचा ठराव तेलंगण विधानसभेने मंजूर केला. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी हा ठराव मांडला. ‘लोकसंख्येच्या आधारावर फेररचना झाली, तर दक्षिणेकडील राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व १९ टक्क्यांवर येईल’ असा दावा त्यांनी केला.

केंद्र सरकारच्या प्रस्तावित वक्फ सुधारणा विधेयक २०२४च्या विरोधात तमिळनाडू विधानसभेने गुरुवारी ठराव मंजूर केला. ‘केंद्र सरकारने हे विधेयक मागे घ्यावे. त्याचा अल्पसंख्याक मुस्लिमांना फटका बसेल,’ यावर त्यांनी भर दिला. भाजप सदस्यांचा विरोध आणि सभात्यागादरम्यान हा प्रस्ताव मंजूर झाला. त्याला मुख्य विरोधी पक्ष अण्णाद्रमुक आणि भाजपचे सहयोगी पीएमके यांच्यासह अन्य सर्व पक्षांचे समर्थन मिळाले. ‘या विधेयकामुळे वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर गदा येईल. हे धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात आहे,’ असे स्टॅलिन यांनी अधोरेखित केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.