मराठवाडा, विदर्भाचे पाणी तोडण्यासाठी लॉबी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप.

 विदर्भ आणि मराठवाड्याला पाणीच मिळू नये, यासाठी राज्यात एक लॉबी सक्रिय आहे,’ असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.‘नाशिक, नगरहून मराठवाड्यातील जायकवाडीमध्ये पाणी आणण्यासाठी नाकी नऊ आणले गेले. विदर्भ आणि मराठवाड्याला पाणीच मिळू नये, यासाठी राज्यात एक लॉबी सक्रिय आहे,’ असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.राज्य सरकारला आत्महत्येपूर्वी पत्र लिहून शिवणी आरमाळ येथील पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली. गुरुवारी नागरे कुटुंबीयांचे अंबादास दानवे यांनी सांत्वन करून धीर दिला. सोबतच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या पुढाकारातून जिल्हा शिवसेनेच्या वतीने पाच लाख रुपयांचा बचत ठेव स्वरूपातील (एफडी) निधी नागरे कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी दानवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले, ‘कैलास नागरे यांचे हे बलिदान आहे, त्याला आत्महत्या म्हणता येणार नाही. ज्या १४ गावांसाठी कैलास नागरे यांनी बलिदान दिले, तेथील पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे. मुख्यमंत्री काही जरी बोलले तरी त्यांना शब्द बदलायला भाग पाडू.’‘राखीव पाणी मागितलेलेच नाही. ओव्हरफ्लो, वाया जाणारे पाणी मागितले आहे. ११० मीटरची चारी करणे एवढेच काम आहे. कुण्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सिंचनाचे पाणी वळविता येऊ शकत नाही याबाबत चुकीची माहिती दिली आहे. जागा, भूसंपादन कोणताही खर्च नाही.

एक शेतकरी यासाठी आत्महत्या करतोय, हे दुर्दैव आहे. येत्या १० एप्रिलच्या आत मंत्रालयात बैठक बोलावू,’ असेही दानवे यांनी नमूद केले.कैलास नागरे यांच्या भगिनी स्नेहल यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, ‘आमचा भाऊ गेल्यानंतर उघड्या पडलेल्या परिवाराकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही. भावाने केलेल्या मागण्या पूर्ण होत नाहीत. दारामध्ये जो येतो, तो सहानुभूती दाखवतोय. आश्वासन देऊन जातो. नुसते आश्वासन देऊ नका, लेखी द्या, अशी माझी प्रत्येकाला विनंती आहे.’

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.