पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीवर मुंबईत सामूहिक अत्याचार, हॉटेल आणि कारमध्ये चौघांचं कुकर्म.

लग्न आणि प्रेमाचे आमिषाने तरुणी आरोपीला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात आली. दोघेही तिथेच एका हॉटेलमध्ये राहिले. या वेळी आरोपीने पीडितेच्या शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकल्यापुण्यात एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या अभियंता तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीच्या प्रियकराने हॉटेलमध्ये आणि कारमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार  केला. त्यानंतर त्याने मित्रांना बोलावून घेतले आणि चौघांनी पीडितेवर बलात्कार केला.या प्रकरणात ३३ वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून तिच्या प्रियकरासह चौघांवरगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मुंबईच्या हद्दीत झाल्याने गुन्हा मुंबई पोलिसांना वर्ग करण्यात आला आहे.काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कर्नाटक राज्यातील असून, ती पुण्यातील एका नामांकित कंपनीत आयटी अभियंता म्हणून काम करते.

सन २०२१ मध्ये तिची आरोपीशी समाजमाध्यमातून ओळख झाली होती. कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला जाळ्यात ओढले.लग्न आणि प्रेमाचे आमिषाने तरुणी आरोपीला भेटण्यासाठी मुंबईतील कांदिवली परिसरात आली. दोघेही तिथेच एका हॉटेलमध्ये राहिले. या वेळी आरोपीने पीडितेच्या शीतपेयात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. तरुणीला गुंगी चढल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी कारने पीडितेला पुण्याकडे घेऊन निघाला.या दरम्यान आरोपी आणि त्याच्या मित्रांनी पीडितेवर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नसून, त्यांनी तरुणीचे अश्लील फोटो काढले.

ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडितेकडून तब्बल २८ लाख रुपये उकळले. ही रक्कम देण्यासाठी पीडित तरुणीने कर्ज घेतले होते. आरोपीने पीडितेकडून दोन महागडे मोबाइलदेखील घेतले. आरोपी आणि त्याच्या मित्रांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून हे ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू होते. आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडितेने काळेपडळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हा कांदिवली पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.