हातपाय मोडले, चटके दिले; ज्या चिमुरडीला क्रूरपणे संपवलं, तिला पाच हजारात घेतलेलं विकत, मग जीव का घेतला.

छत्रपती संभाजीनगरात एका चिमुकलीची तिच्याच आई-वडिलांनी छळ करुन हत्या केली आहे. या चिमुरडीला ५ हजार रुपयांमध्ये विकत घेण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.अवघ्या ४ वर्षांच्या आयत नावाच्या चिमुकलीचा निर्दयीपणे खून प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ४ मुलानंतर मुलगी हवी म्हणून आरोपी फइमने एका जमातमध्ये एका दारुड्या बापाकडून अवघ्या ५ हजार रुपयात आयतला विकत घेतले होते. या व्यवहारात चक्क १०० रुपयांच्या बॉण्डवर करार देखील केला होता. मुलगी दत्तक घेतल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले. यातूनच आयतचा खून झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.आयत फईम शेख वय ४ वर्ष असे निर्दयीपणे खून केलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर फौजिया शेख फईम वय २७, शेख फईम शेख अयुब वय ३५ रा. अजिंठा हली मुक्काम मुगलपुरा सिल्लोड असे आरोपींची नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जालना येथील नाझियाचे पंधरा वर्षांपूर्वी शेख नसीम अब्दुल कयूम (वय ३५ वर्ष) याच्या सोबत झाला होता.

विवाहानंतर या दाम्पत्याला पाच मुली झाल्या होत्या. यानंतर पती दारूच्या आहारी गेला. नाझियाला तो नीट वागवत नव्हता. यामुळे नाझिया आणि नसीम यांच्यात जून २०२४ मध्ये घटस्फोट झाला होता.पाच पैकी चार मुली नाझियाकडे होत्या, तर आयत ही वडील शेख नसीमकडे होती. नाझियाच्या चार मुली तिचा दुसरा पती सांभाळत होता. शेख नसीम याला दारूची सवय होती तो चिमुकल्या आयतला अक्षरश: भीक मागायला लावायचा. दरम्यानच्या काळात एका जमातमध्ये मध्यस्थीमार्फत शेख नसीमची आरोपी शेख फईम याच्यासोबत जालन्यात भेट झाली. यातून ६ महिन्यांपूर्वी आयतला पाच हजार रुपयांमध्ये त्याने फईमला विकले.

या व्यवहाराचा चक्क १०० रुपयाच्या बॉण्ड वर करार देखील केला.आयतची हत्या करणारा वडील शेख फईम आणि आई फौजीया हे दोघे अजिंठ्यातील इंदिरानगर भागामध्ये राहत होते. चार मुलांनंतर मुलीला दत्तक घेतल्याच्या कारणावरून फइम व फौजिया यांच्यात खटके उडू लागले. ते अजिंठा हे गाव सोडून पंधरा दिवसांपूर्वी सिल्लोड शहरात राहायला आले. त्यानंतर दोघे मिळून चिमुकल्या आयतचा छळ करू लागले. यातूनच तिची हत्या झाली. दरम्यान, या प्रकरणात आयतची सख्खी आई नाझियाचा सिल्लोड शहर पोलिसांनी जबाब घेतला आहे.आयतला विकण्याचा सौदा कोणासोबत झाला? या व्यवहारात कोण होतं? कुणाच्या ओळखीतून हा सगळा प्रकार सुरू होता? दोघांनी विकत घेतल्यानंतर मुलीला का मारलं? या संदर्भातला तपास पोलीस करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.