आफ्रिकेच्या हद्दीत जहाज हायजॅक, रत्नागिरीतील दोन तरुण ओलीस, कुटुंबिय चिंतेत, १० दिवस होऊनही संपर्क नाही.

आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाच्यांनी डांबर वाहतूक करणारे जहाज हायजॅक केले असून, त्यात रत्नागिरीतील दोन तरुणांसह १० जणांना ओलीस ठेवले आहे. दहा दिवस होऊनही मुलांसोबत संपर्क होत नसल्याने पालक हे चिंतेत आल्याचे बघायला मिळतंय.समुद्री चाच्यांकडून अनेकदा जहाजावरील कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. असाच एक अतिशय धक्कादायक प्रकार आफ्रिकेच्या हद्दीत घडला असून यामध्ये रत्नागिरी येथील दोन तरुणांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीये. या सगळ्या प्रकरणाची माहिती कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत नुकताच दिलीये.आफ्रिकेच्या हद्दीत नायजेरियन समुद्री चाच्यांनी डांबर वाहतूक करणारे जहाज हायजॅक केले असून रत्नागिरीतील दोन तरुणांसह दहा जणांना ओलीस ठेवले असल्याची धक्कादायक माहिती पुढे येतंय. अकरा दिवस उलटू देखील याबाबत काहीच मिळत नसल्याने आपली मुले सुरक्षित आहेत की नाही या चिंतेत पालक आहेत.

एमव्ही बीटू (imo no ९९१८१३३) हे डांबर वाहतूक करणारे जहाज वेस्ट आफ्रिकेच्या हद्दीत गेल्यानंतर समुद्री लुटारूंच्या (पायरेट्स) ताब्यात सापडले.या जहाजावर एकूण १८ क्रू मेंबर असून यातील १० जणांना हे हल्लेखोर आपल्यासोबत घेऊन गेले. या दहा जणांमध्ये सात भारतीय तर तीन रोमेनियन नागरिक आहेत. समुद्राच्या आणि ओलीस ठेवलेल्यांमध्ये समीन जावेद मिरकर (रा. भाटकरवाडा, पेठकिल्ला, रत्नागिरी) आणि रिहान शब्बीर सोलकर (रा. कर्ला) या दोन रत्नागिरीतील तरुणांचा समावेश आहे. याबाबत जमीन आणि रिहान यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. कंपनीने अचानक जहाज हायजॅक झाल्याचे कळवले.

मात्र अकरा दिवस उलटूनही अद्याप त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.मुलांच्या पालकांनी याबाबत मंत्री उदय सामंत यांच्यासह केंद्रीय मंत्री व अन्य लोकांशी ईमेल द्वारे संपर्क साधला आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी या पालकांनी केली आहे. मुलांबाबत कोणतेही माहिती कळत नसल्याने त्यांचे कुटुंबीय काळजीत पडले आहे. मुलांची कधी सुटका होणार, त्यांच्याशी काहीही संपर्क कंपनीचा झाला का? याबद्दलची काहीच माहिती ही पालकांना मिळताना दिसत नाहीये.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.