थायलंडमध्ये जर्मन तरुणीवर अत्याचार करणाऱ्या साताऱ्यातील दोन तरुणांना कोणती शिक्षा मिळणार.

साताऱ्यातील दोन तरुणांनी थायलंडमध्ये जात भारताची मान शरमेने खाली घालणारं कृत्य केलं होतं. विजय दादासाहेब घोरपडे (वय 47) आणि राहुल बाळासाहेब भोईटे (वय 40) या साताऱ्यातील दोन तरुणांनी थायलंडमधील एका बीचवर 24 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले होते. दरम्यान, तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर दोघांना थायलंड पोलिसांनी अटक केली असून त्यांना तुरुंगात रवाना करण्यात आलंय.थायलंडमध्ये 14 मार्च रोजी रिन बीचवर फुल मून पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पीडित तरुणी तिच्य मित्रासोबत या ठिकाणी आली होती. ही पार्टी रात्रभर सुरुच राहिली. दरम्यान पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील या दोन तरुणांनी पीडितेला खडकाळ भागात नेले आणि त्याठिकाणी त्यांच्यावर अत्याचार केले. त्यानंतर या तरुणांनी राहत असलेल्या बंगल्याकडे पळ काढला. दरम्यान, अत्याचार झाल्यानंतर तरुणी शुद्धीत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर तपास सुरु केला होता. दरम्यान, तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने आरोपींची ओळख पटवली. दरम्यान,  विजय घोरपडे यांने त्याच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य केले. तर राहुल भोईटे यांनी आरोप नाकारले होते.

परंतु, पिडीतेला मिठी मारल्याचे आणि तिचे चुंबन घेतल्याचे कबूल केले. पण पीडितेने प्रतिकार केला म्हणून आम्ही तिच्यावर बलात्कार केला नाही, असा दावा राहुल भोईटे यांनी केला.साताऱ्यातील दोन तरुणांवरील आरोप सिद्ध झाल्यास कोणती शिक्षा दिली जाऊ शकते?दरम्यान, साताऱ्यातील या दोन तरुणांवरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना कोणती शिक्षा मिळू शकते? थायलंडमधील काय सांगतो? जाणून घेऊयात.. थायलंडमध्ये 276 ते 281 या कलमान्वये आरोपींना देण्यात येणाऱ्या शिक्षेची तरतुद केली आहे.  थायलंडमधील च्या माहितीनुसार, जर एखाद्या महिलेच्या इच्छेविरोधात कोणत्याही प्रकारे धमकी देऊन किंवा हिंसाचार करुन लैंगिक अत्याचार केल्यास संबंधित आरोपीला  कलम 276 नुसार 4  ते 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. यशिवाय दंड देखील ठोठावला जाऊ शकतो.

कलम 277 नुसार, 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या किंवा अल्पवयीन मुलीवर  लैंगिक अत्याचार केल्यास 4 ते 20 वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणात मुलीची संमती असो अथवा नसो थायलंडमध्ये हा गुन्हाच ठरतो. जर अत्याचाराचा गुन्हा 13 वर्षांपेक्षा लहान मुलीवर झाला तर  गुन्हेगाराला 7 ते 20 वर्षांचा तुरुंगवास आणि न्यायालयाने सुनावलेली दंडाची रक्कम भरावी लागते. मत्र, जर 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलीवर तिच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले तर न्यायालयाकडून लग्नाची परवानगी दिली जाऊ शकते. तर गुन्हेगाराला देखील कोणतीही शिक्षा सुनावली जाणार नाही. न्यायालयाने शिक्षा भोगत असताना त्यांना एकत्र लग्न करण्याची परवानगी दिली, तर न्यायालय अशा गुन्हेगाराला मुक्त करेल.जर 276 किंवा 277 कलमान्वये गुन्हे केलेल्या प्रकरणात पीडितेला गंभीर शारीरिक हानी पोहोचली तर, गुन्हेगाराला 15 ते 20 वर्षांचा तुरुंगवास किंवा जन्मठेपेची शिक्षा  दिली जाऊ शकते. पीडितेचा मृत्यू झाला असेल तर गुन्हेगाराला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.