बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेला आसाराम अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहे. अहमदाबादच्या मोतारामध्ये असलेला आसारामचा आश्रम अचानक चर्चेत आला आहे. गुजरात सरकारनं २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी एक मास्टर प्लान तयार केला आहे.अहमदाबाद: बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेला आसाराम अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहे. अहमदाबादच्या मोतारामध्ये असलेला आसारामचा आश्रम अचानक चर्चेत आला आहे. गुजरात सरकारनं २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी एक मास्टर प्लान तयार केला आहे. त्यानुसार आसारामच्या आश्रमाच्या जमिनीवर सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह आणि ऑलिम्पिक व्हिलेज उभारण्याची सरकारची योजना आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या जवळ ६५० एकरवर ऑलिम्पिक व्हिलेज तयार करण्यात येणार आहे. यासाठी आसारामच्या अन्य दोन आश्रमांच्या जमिनीदेखील अधिग्रहित केल्या जाणार आहेत. या संपूर्ण योजनेमुळे अहमदाबादचं रुपडं पालटणार आहे.
आसाराम २०१८ पासून बलात्कार प्रकरणात तुरुंगात आहे. त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. पण आता त्याच्या आश्रमावर सरकारचं लक्ष गेलं आहे. आसारामच्या आश्रमाची जमीन सरदार वल्लभभाई पटेल (एसव्हीपी) स्पोर्ट्स एन्क्लेव्हसाठी अधिग्रहित केली जाणार आहे. यासोबतच भारतीय सेवा समाज आणि सदाशिव प्रज्ञा मंडल नावाच्या दोन आश्रमांच्या जमिनीदेखील याच मास्टर प्लानचा भाग असणार आहेत.











