पुण्यात एकामागे दररोज हत्येच्या, गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून हत्याराचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग केल्याचं समोर आलं आहे.पुण्यात सावित्रीच्या लेकी सुरक्षित राहिल्या नाहीत, असंच चित्र समोर दिसतं आहे. पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून गुन्हेगारी सोबत महिलांची सुरक्षा देखील धोक्यात आल्याची परिस्थिती आहे. विविध ठिकाणी सर्रासपणे हत्यारांचा वापर होत आहे. हत्यारांनी भरचौकात, रस्त्यात हत्येच्या अनेक घटना मागील काही दिवसांत समोर आल्या आहेत. पुण्यात पुन्हा एकदा अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्याराचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर तरुणी भयभीत झाली होती, तब्बल चार दिवसानंतर या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.











