आधी खासदारकी गेली, दादांकडे येताच आमदारकीचं स्वप्नही भंगलं; बडा नेता दुसऱ्यांदा NCP सोडणार?

दोन टर्म खासदार राहिलेले संजय काका पाटील घरवापसी करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी दोन पराभव पाहिले. आधी लोकसभेला आणि मग विधानसभेला त्यांचा पराभव झाला.सांगली: दोन टर्म खासदार राहिलेले संजय काका पाटील घरवापसी करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी दोन पराभव पाहिले. आधी लोकसभेला आणि मग विधानसभेला त्यांचा पराभव झाला. लोकसभेची निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवली. त्यांनी हॅट्ट्रिकची संधी होती. पण त्यांचा पराजय झाला. यानंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा लढले. त्यातही त्यांना पराभव पाहावा लागला. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.
भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी संजय काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हापासूनच संजय काका पाटील राष्ट्रवादीतच राहणार की पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा सुरु झाली होती. आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काकांची त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतल्यानं त्यांच्या घरवापसीच्या चर्चेनं जोर धरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास संजय पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना २००८ ते २०१४ या कालावधीत ते विधान परिषदेचे आमदार होते. फेब्रुवारी २०१४ मध्ये त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यावेळी देशात मोदी लाट होती. त्याचा फायदा पाटील यांना झाला. लोकसभा निवडणुकीत ते २ लाख २८ हजार मतांनी विजयी झाले. त्यांच्यामुळे भाजपचं कमळ सांगली लोकसभेत पहिल्यांदा फुललं. तब्बल ५२ वर्षे काँग्रेसचा गड राहिलेली सांगलीची जागा पाटील यांच्यामुळे भाजपकडे गेली.२०१९ मध्येही संजय काका पाटील लोकसभेवर निवडून गेले. त्यावेळी त्यांनी १ लाख ६४ हजार ३५२ मतांनी विजय मिळवला. स्वाभिमानीच्या तिकिटावर लढलेल्या विशाल पाटलांचा पराभव करत पाटील दुसऱ्यांदा खासदार झाले. २०२४ मध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. ते अपक्ष लढले आणि त्यांनी संजय पाटलांचा १ लाख मतांनी धुव्वा उडवला. विजयी झाल्यानंतर पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला.लोकसभेला पराभूत झालेल्या संजय काका पाटलांनी तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून विधानसभा लढण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. ही जागा महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं संजय काका पाटलांनी घड्याळ हाती घेतलं. पण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला. रोहित पाटलांनी २७ हजार ६४४ मतांनी बाजी मारत संजय काकांचा पराभव केला. ६ महिन्यात दुसरा पराभव संजय काकांच्या वाट्याला आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. संजय काका पाटील दुसऱ्यांदा राष्ट्रवादी सोडतील आणि दुसऱ्यांदा भाजपमध्येच जातील, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.