ज्या गाडीतून देशमुखांचं अपहरण, आता तीच काळी स्कॉर्पिओ आरोपींना शिक्षेपर्यंत नेणार; अहवालात १९ पुरावे सापडले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आरोपींच्या काळ्या स्कॉर्पिओचा अहवालही समोर आला आहे. याच गाडीतून देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं. या स्कॉर्पिओतून १९ पुरावे सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. या हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनीच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं सांगितलं. तर, आता याप्रकरणी काळ्या स्कॉर्पिओतील पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ही काळी स्कॉर्पिओ या गुन्ह्यात वापरण्यात आली होती. या गाडीत एकून १९ पुरावे आढळून आले आहेत. हे पुरावे आरोपींना शिक्षेपर्यंत नेणार असल्याची माहिती आहे (Beed Murder Case).

या गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल महाराष्ट्र टाईम च्या हाती लागला आहे. या आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी याच गाडीमधील फिंगरप्रिंट्स आणि हे पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत.काळ्या रंगाची स्कार्पिओ पासिंग क्रमांक एम एच ४४ झेड ९३३३ या गाडीवर एकून ९९ ठसे आढळून आले आहेत डाव्या बाजूच्या दरवाज्यावरील काचेवर २ ठसे मिळाले आहेत. जुळून आलेले फिंगरप्रिंटचे ठसे सुधीर ज्ञानोबा सांगळे या आरोपीचे आहेत, असा अहवाल फिंगरप्रिंट ब्युरोने दिला आहे.ही स्कॉर्पिओ गाडी आरोपी गँगचा म्होरक्या सुदर्शन घुलेची आहे .संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी टाकळी शिवारात अमानुष मारहाण करत हत्या करण्यात आली होती. यातील आरोपी प्रतीक घुले याला सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता. यावेळी प्रतीक घुले याने संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणी मारहाण केली ते ठिकाण दाखवत त्याच्या जवळच असलेल्या एका काटेरी झुडपातून मारहाण करण्यासाठी वापरलेली बांबूची जाड काठी देखील काढून दिली होती.. माऊली कारखाना ते टाकळी रोडवर आम्ही संतोष पंडितराव देशमुख यास विविध हत्याराने मारून त्याचा खून केला होता. त्यावेळी मी त्याला मारण्याकरता वापरलेलं हत्यार तेथे लपवून ठेवले आहे ते ठिकाण दाखवतो आणि हत्यार देखील देतो असे प्रतीक घुले यांनी पंचायत समक्ष सांगितले होते, तो पंचनामा आता समोर आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.