विद्यार्थ्यांचा जीवाशी ‘खेळ’, शाळेतील २५ मुलांच्या हातावर ब्लेडच्या खुणा, धक्कादायक सत्य उघड.

गुजरातच्या शाळेत भयानक प्रकार समोर आला आहे. २५ पेक्षा जास्त मुलांच्या हाती ब्लेडच्या खूणा आढळल्या आहे. या घटनेचा तपास घेतला त्यावेळी धक्कादायक सत्य समोर आले आहे.गुजरातच्या शाळेत एक भयानक प्रकार घडला आहे. मुंजियासरच्या शाळेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या २५ पेक्षा जास्त मुलांच्या हातावर ब्लेडने मारल्याच्या खुणा आढळल्या आहेत. सौराष्ट्र भागातील अमरेली जिल्ह्यात हे घडले आहे. सुरुवातीला या खुणा ऑनलाईन खेळापायी होत असल्याचा संशय निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र वेगळेच सत्य समोर आले आहे.शाळेतील लहान मुलांच्या हातावर ब्लेडचे निशाण दिसल्याने सरकार अ‍ॅक्शन मोडवर मध्ये आले. सरकारने या प्रकरणाची चौकशी करायला सांगितली आहे. शाळेतील मुले एक धोकादायक खेळ खेळत होते, असे तपासामध्ये समोर आले आहे.

ट्रुथ अँड डेअर नावाचा खेळ खेळताना हे घडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.काही पालकांनी त्यांच्या मुलांच्या हातावर ब्लेडचे निशाण बघितले. त्यांना खूप काळजी वाटली. त्यांनी शाळेत जाऊन याबद्दल विचारले. शाळेत जास्त मुलांच्या हातावर असे निशाण दिसल्यावर ग्रामपंचायतीने पोलिसांना सांगितले. सुरुवातीला, मुले ऑनलाईन गेममुळे मुळे असे वागत आहेत, असे वाटले. पण, धारीचे एएसपी जयवीर गढवी यांनी शाळेला भेट दिली.

त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि मुलांशी बोलले. तेव्हा हे ऑनलाईन गेम मुळे नाही, तर ट्रुथ अँड डेअर खेळामुळे झाले, असे समजले.गुजरात राज्याचे प्राथमिक शिक्षण मंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी या घटनेची माहिती घेतली. त्यांनी लगेच चौकशीचे आदेश दिले आहेत. लहान मुले ब्लेड मारण्याचा खेळ खेळत आहेत, हे ऐकून शिक्षण खात्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षण खात्याचे अधिकारी आता तपास करत आहेत. इतर शाळांमध्येही असे काही चालले आहे का, हे ते बघत आहेत. मुले इतके दिवस ट्रुथ अँड डेअर खेळत होते, तर त्यांना कोणी का थांबवले नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ते या प्रकरणाची पूर्ण चौकशी करतील.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.