योगा शिक्षकाचं अपहरण, नंतर ७ फूट खड्ड्यात जिवतं पुरलं; तीन महिन्यांनी भयंकर घटना समोर.

प्रेमप्रकरणातून योगा शिक्षकाला अतिशय क्रूरपणे संपवलं असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.प्रेमप्रकरणात एका योगा शिक्षकाचा जीव गेल्याचं भयंकर प्रकरण समोर आलं आहे. योगा शिक्षकाचं अपहरण करुन त्याला दूरवर नेत जिवंत पुरलं असल्याची हळबळजनक घटना घडली आहे.प्रेमप्रकरणातून बाबा मस्तनाथ यूनिव्हर्सिटीतील योग शिक्षक जगदीप झज्जर यांचं अपहरण करण्यात आलं. जगदीप झज्जर हे जिल्ह्यातील मांडोठी गावात राहणारे होते. ते २४ डिसेंबर रोजी बेपत्ता झाले. अपहरणाच्या १० दिवसांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. पण तब्बल तीन महिने योग शिक्षक जगदीप यांचा काहीच पत्ता लागला नव्हता.पोलीस तपास करत असताना त्यांना काही गोष्टी आढळल्या. योग शिक्षक ज्या घरात भाड्याने राहत होता, तिथेच एका महिलेशी त्याची जवळीक वाढली होती.

त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्यावेळी महिलेच्या पतीला या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली, त्यावेळी महिलेच्या पतीने आपल्या साथीदारांसह मिळून जगदीपचं अपहरण केलं. त्याला बेदम मारहाण केली आणि त्याचे हात – पाय बांधून त्याला एका ठिकाणी तब्बल सात फूट खोल खड्डा खणून गाडलं. त्यांना तब्बल ६१ किमी दूर एका गावात जिवंत पुरण्यात आलं.२४ डिसेंबर रोजी योग शिक्षकाचं अपहरण झाल्यानंतर तीन महिने उलटून गेले तरीही योग शिक्षक काही केल्या लागत नव्हता.

पोलिसांकडून तपास सुरू असताना पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारे तपास सुरू केला, यावेळी पोलिसांना अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर अखेर तीन महिन्यांनी २४ मार्च रोजी पोलिसांनी योग शिक्षकाला शोधून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला.याप्रकरणी महिलेच्या पतीनेच हे कृत्य केल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी हरदीप आणि धर्मपाल या दोन आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या ताब्यात असलेल्या आरोपींकडून पोलिसांची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून इतर काही माहिती समोर येईल. मात्र योग शिक्षकाची हत्या ही केवळ प्रेमप्रकरणातून झाली की यामागे इतर काही कारणं आहेत? यादृष्टीनेही तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.