‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या जोडप्याला मारहाण; मध्यरात्री घरात घुसले आणि… बारामतीतील भयंकर घटना.

बारामतीमध्ये जोडप्याला मध्यरात्री घरात मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जोडप्याला कुऱ्हाडी, लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली आहे.’लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेला तिच्या पुतण्याने दोघांच्या मदतीने बेदम मारहाण केली. यात तिच्यासोबत राहणारा ३२ वर्षीय युवकही गंभीर जखमी झाला. महिलेवर सोमेश्वरनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या कटात या महिलेच्या मुलाने व सूनेनेही आरोपींना साथ दिली. जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी पुतण्यासह दोघा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल केला.

माळशिरस तालुक्यातील पिंपरे येथील ही महिला सदोबाचीवाडी येथे राहते. गेल्या आठ वर्षांपासून ती गावातील एका तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहे. तो तिच्याच घरात राहतो. १८ मार्च रोजी तिचा पुतण्या तिला भेटण्यासाठी गावाकडून आला होता. रात्री जेवणखाण झाल्यानंतर घरात फिर्यादी झोपली. तिच्यासोबत राहणारा तरुण रात्री कामावरून परत येऊन किचनमध्ये जावून झोपला.रात्री अडीचच्या सुमारास तिच्या पुतण्याने दोघा अनोळखी व्यक्तींना घरात बोलावले. ते हातामध्ये कुऱ्हाड, लाकडी दांडके घेवून आले.

फिर्यादी चुलतीला पुतण्याने तु लिव्ह इनमध्ये का राहते, तुझ्या अशा वागण्याने समाजात आमची अब्रू जाते असे सांगत त्याच्या हातातील कुऱ्हाड फिर्यादीच्या डोक्यात मारली.दोघा अनोळखींकडून दांडक्याने मारहाण करण्यात आली. तिच्या घरातील किचनमध्ये झोपलेल्या तरुणालाही कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. त्यात जो जखमी झाला. डोक्यातून रक्त येऊ लागल्यानंतर या दोघांनी जोराचा आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा होतील या भीतीपोटी हे तिघे हत्यारे टाकून पळून गेले. दरम्यान या महिलेची सून आणि मुलगा घराबाहेरच्या खिडकीतून मारहाणीचा हा प्रकार पाहत होते. त्यांच्याच साथीने हा प्रकार घडला असावा अशी शक्यता फिर्यादीत व्यक्त करण्यात आली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.