मला बोलण्यास मज्जाव; लोकसभाध्यक्षांच्या तिखट सल्ल्यानंतर राहुल यांचा गंभीर आरोप.

लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल यांना सभागृहाचे नियम आणि शिष्टाचारानुसार वागण्याचा सल्ला दिल्यानंतर राहुल यांनी बिर्ला यांच्यावर आरोप केले.‘लोकसभेचे कामकाज लोकशाहीविरोधी पद्धतीने चालवले जात आहे. आपल्याला बोलण्याची संधी दिली जात नाही’, असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल यांना सभागृहाचे नियम आणि शिष्टाचारानुसार वागण्याचा सल्ला दिल्यानंतर राहुल यांनी बिर्ला यांच्यावर आरोप केले.लोकसभेत शून्य प्रहरानंतर सदस्यांना संबोधित करताना बिर्ला यांनी राहुल गांधी यांना कानपिचक्या दिल्या. ‘अनेकदा वडील-मुलगी, आई-मुलगी आणि पती-पत्नी या सभागृहाचे सदस्य राहिले आहेत. यासंदर्भात विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाच्या नियमांनुसार आणि परंपरांनुसार वागणे अपेक्षित आहे. सभासदांनी सभागृहाच्या शिष्टाचाराचा आणि सभ्यतेचा उच्च दर्जा राखणे अपेक्षित आहे.

सदस्यांचे वर्तन सभागृहाच्या उच्च परंपरा आणि मानकांनुसार नाही, अशा अनेक घटना माझ्या निदर्शनास आल्या आहेत’, असे सांगत बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.या घटनेनंतर राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना बिर्ला यांना लक्ष्य केले. ‘लोकसभा अध्यक्षांनी माझ्याबद्दल काहीतरी सांगितले.  मी उभा राहिलो तेव्हा ते उठले आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करून निघून गेले. जेव्हा जेव्हा मी सभागृहात बोलण्यासाठी उभा राहतो तेव्हा मला बोलण्याची परवानगी दिली जात नाही. विरोधी पक्षनेता उभा राहिला तर त्याला बोलण्याची परवानगी द्यावी, अशी परंपरा आहे.

गेल्या सात-आठ दिवसांत मी काही बोललोही नाही.आजही मी शांत बसलो होतो. लोकशाहीमध्ये सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनाही स्थान असते, पण इथे लोकशाहीला स्थान नाही’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस सुमारे ७० खासदारांनी बिर्ला यांची भेट घेतली आणि विरोधी पक्षनेत्यांना बोलण्याची संधी न दिल्याबद्दल निषेध नोंदवला.काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत कथित अपमानास्पद वक्तव्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसने बुधवारी राज्यसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला. ‘राज्यसभेत शहा यांनी जे काही सांगितले ते सोनिया गांधींची प्रतिष्ठा खराब करण्याच्या उद्देशानेच होते,’ असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला. रमेश यांनी सभापती जगदीप धनखड यांना पत्र पाठवले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.