खारी, टोस्ट आणण्यासाठी निघालेल्या व्यावसायिकावर गोळीबार, पहाटेच्या घटनेने खळबळ.

छत्रपती संभाजीनगर येथे खारी टोस्ट आणण्यासाठी जात असलेल्या व्यावसायिकावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संशयितांचा शोध घेत आहेत. हसीब काझी यांनी गोळीबार करणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.भल्या पहाटे रोजा केल्यानंतर दुचाकीवरून खारी टोस्ट आणण्यासाठी जात असलेल्या एका युवकावर अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना २६ मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास नवाबपुरा भागातील जालीवाली मशिदीजवळ घडली. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. आसपासच्या सीसीटीव्हीसह संशयितांचाही शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिन्सी पोलिस ठाण्यात हसीब महंमद सलीम काझी (वय ३३, रा. जालीवाली मशिदीजवळ, नवाबपुरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हसीब काझी जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करतात. २६ मे रोजी पहाटे चारच्या दरम्यान ते दुचाकीवरून खारी टोस्ट आणण्यासाठी रोशन गेट, सिमा दूध डेअरीकडे निघले होते. घरापासून पन्नास फुटांच्या अंतरावर असताना फटाका फुटल्यासारखा आवाज आला. हा आवाज येताच गाडीचा टायर फुटला का? यामुळे हसीब काझी यांनी दुचाकी थांबवली.

गाडी पाहत असता, त्याच्यापासून १५ फुटांच्या अंतरावर एक सहा फूट उंच, सडपातळ बांध्याची व्यक्ती उभी असलेली दिसली. त्या व्यक्तीने हसीब काझी याच्याकडे पाहून हातातील बंदुकीने एक गोळी झाडली. ही गोळी हसीब काझी यांच्या टोपीच्या जवळून गेली. हसीब काझी यांनी त्वरित त्यांची दुचाकी चालू केली. पुन्हा घराकडे धाव घेतली. या प्रकरणात हसीब काझी यांनी त्यांचा जीव घेण्याच्या उद्देश्याने त्यांच्यावर दोन राउंड फायर करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत.जिन्सी भागात एका व्यावसायिकावर गोळीबार झाल्याचे प्रकरण समोर येताच, पोलिस विभागही कामाला लागले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जिन्सी पोलिस ठाण्याचे तीन पथके आणि गुन्हे शाखेचे चार पथके कामाला लागली आहे. आसपास सीसीटीव्हीतून संशयितांचा शोध सुरू केला आहे. याशिवाय तक्रारीत संशयिताचाही शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणात हसीब काझी यांच्यावर झालेलया हल्ल्यानंतर ते घरी गेले. त्यांनी उजेड झाल्यानंतर त्यांची गाडीची पाहणी केली असता, दुचाकीवरील डाव्या बाजूला इंग्रजीत लिहिलेल्या दुचाकीच्या नावाच्या ठिकाणी गोळी लागून, त्या ठिकाणी छिद्रे पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आली अशीही माहिती समोर आली आहे.हसीब काझी यांनी त्यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात दिलेल्या तक्रारीत सांगितले, की हसीब काझी यांच्याकडे दुकान भाड्याने घेतलेल्या नासेर सय्यद रौफ (रा. कटकट गेट) याच्यासोबत वाद सुरू आहे. त्याला आणखी एक दुकान पाहिजे. त्याने इतर भाडेकरूंना सोबत घेऊन, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दिली. त्या गुन्ह्यात बी फायनल गेल्याने, नासेर रौफ हा हसीब काझी याच्या मित्राला भेटला. त्याने मी हसीब याला पोक्सोमध्ये अडकवेल असे सांगितले. याची व्हिडीओ रिकॉर्डींगही केली. या गोळीबारात नासेर सय्यद रौफ याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.