संविधानावरुन काँग्रेस लक्ष्य; इतिहासातील दाखले देत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विधानसभेत घणाघात.

 ‘आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान गोठवण्यात आले. ४२व्या घटनादुरुतीमुळे राष्ट्रपतींना बाहुले बनवण्यात आले होते. काँग्रेसने संविधानाची अशी वारंवार पायमल्ली केली’, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केला.‘भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर विधानसभेत दोन दिवस झालेल्या चर्चेचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाने झाला. या चर्चेत सहभागी होताना काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादीचे (शरद पवार) जयंत पाटील आदींनी संविधानातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे दाखले देत केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली होती. त्यास उत्तर देताना फडणवीस यांनी १९६७ ते १९७७ या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या घटनांचा दाखला देत तत्कालीन काँग्रेस नेतृत्वच संविधानाचे मारेकरी होते, असा आरोप केला. ‘देशाचे संविधान अनेक संकटांतून तावून-सुलाखून निघाले असून, ते परिपक्व झाले आहे. हे अतिशय सुंदर, समन्यायी आणि प्रत्येकाच्या स्वप्नाला पंख देणारे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. प्रत्येक भारतीयाच्या विकासाचे ते अस्र आहे’, असे गौरवोद्गार फडणवीस यांनी विधानसभेत काढले.‘देशाच्या सर्व संस्थांना कलंकित करायचे, त्यांच्यावर बोटे उचलायची, त्या संस्थांना एकप्रकारे अराजकाकडे न्यायचे, असे प्रकार सुरू आहेत. या संस्थांची बदनाम केली जाते तेव्हा आपण संविधानावर अविश्वास दाखवतो.

कारण या संविधानाने या संस्था निर्माण केल्या आहेत. या संस्था इतक्या भक्कम आहेत की, त्या कोणीही तोडू शकणार नाही. त्यामुळे संविधानाने तयार केलेल्या संस्थांचे काहीच वाईट होऊ शकणार नाही’, असे फडणवीस म्हणाले.‘२४ व्या आणि २६ व्या घटनादुरुस्तीने सर्व अधिकार संसदेकडे घेतले गेले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ते रद्दबातल करताना घटनेच्या मूलभूत चौकटीला हात घालण्याचा कुणालाही अधिकार नाही, असे स्पष्ट जॉर्ज फर्नांडिस यांच्या कुटुंबीयांसोबत जे काही झाले ते आठवले तरी आजही माझ्या डोळ्यांत पाणी येते, अंगावर काटे येतात. विरोधी पक्षातील एक लाखांहून अधिक लोकांना तुरुंगात टाकले होते. माझे वडील दोन वर्षे तुरुंगात होते. काकी शोभाताई फडणवीस तुरुंगात होत्या. डॉ. बाबासाहेबांचे संविधान गोठवून तुम्ही अख्खा विरोधी पक्ष तुरुंगात टाकायचे ठरवले होते,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारचे वाभाडे काढले. ४२व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून छोटी राज्यघटना तयार करण्यात आली.

त्या वेळी राज्यघटनेत ९९ बदल करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ राज्यघटनेत सार्वभौम गणराज्य असा उल्लेख असताना त्यात समाजवादी, धर्मनिरपेक्षता हे शब्द घालण्यात आले, याकडे लक्ष वेधताना फडणवीस यांनी मूळ राज्यघटनेचा आत्मा हा धर्मनिरपेक्ष असाच आहे, हे डॉ. आंबेडकरांना माहिती होते, असेही ठामपणे सांगितले.‘राष्ट्रपती, राज्यपालांना अधिकार देण्यात आलेले आहेत. एखादा निर्णय ते रद्दबादल करू शकतात; परंतु ४२व्या घटनादुरुस्तीनंतर राष्ट्रपती केवळ बाहुले बनले होते. त्यांच्याकडे निर्णय पाठवला तर तो सही करूनच त्यांनी पाठवला पाहिजे, अशी व्यवस्था घटनादुरुस्तीने केली होती,’ असा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.