भारतीय मच्छिमाराने पाकमध्ये संपवलं जीवन; शिक्षा पूर्ण होऊनही सुटका न झाल्याच्या नैराश्यातून टोकाचं पाऊल.

समुद्रात मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत गेल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यात आली होती.पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एका भारतीय मच्छिमाराने शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतरही सुटका न झाल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रात मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत गेल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यात आली होती.या पार्श्वभूमीवर, शिक्षा पूर्ण झालेल्या भारतीयांना तातडीने मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत पाठपुरावा करावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार व शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई यांनी केली आहे.

सन २०२२मध्ये मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीमध्ये गेलेल्या भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानच्या मेरीटाइम सेक्युरिटी एजन्सीने पकडले होते. त्यापैकी एका मच्छिमाराने पाकिस्तानच्या कराचीतील मलीर तुरुंगात मंगळवारी आत्महत्या केली आहे. त्याचे वय ५३ वर्षे होते. या मच्छिमाराला २०२२ मध्ये पाकिस्तानने अटक केली होती. त्याच वर्षी त्याची शिक्षा पूर्ण झाली होती.

मात्र त्याला भारतात परत पाठवण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न झाले नाहीत. पाकिस्तानातील तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय कैद्यांमधील नैराश्याची भावना यामुळे अधोरेखित झाली आहे, याकडे जतीन देसाई यांनी लक्ष वेधले.या मच्छिमाराने नैराश्यातून आत्महत्या केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता तरी या सर्व मच्छिमारांना तत्काळ मायदेशी पाठवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ पत्रकार व शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई यांनी म्हटले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.