पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का? दत्ता गाडेला VC वर न्यायाधीशांनी विचारलं, पुण्याचा नराधम म्हणाला…

स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६) याने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहेस्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेच्या न्यायालयीन कोठडीत आठ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी बुधवारी दिला. त्यामुळे गाडेला येरवडा कारागृहातच राहावे लागणार आहे. दरम्यान, आरोपीविरोधात येत्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिस प्रयत्नशील आहेत.

स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये(वय ३६) याने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपीला २६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत संपल्याने आरोपी गाडेला येरवडा कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी गाडेला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का, अशी विचारणा केली. त्यावर कोणतीही तक्रार नसल्याचे त्याने सांगितले.

न्यायालयाच्या परवानगीने बचाव पक्षाचे ॲड. वाजेद खान-बिडकर यांनी आरोपी गाडेला कारागृहात येऊन भेटून खटल्याबाबत सूचना घेणार असल्याचे सांगितले. पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले उपस्थित होत्या.दरम्यान, या प्रकरणात डीएनए चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. येत्या आठवड्यात हा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता असून, त्यानंतर पोलिसांकडून आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्तीचा प्रस्तावही पोलिसांनी दिला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.