सोबतीचा फायदा कळलाच असेल, रात्री २ वाजता फॉर्म, अजितदादांनी बनसोडेंच्या उमेदवारीचं गुपितच फोडलं.

आपल्याबरोबर राहिले तर कसा फायदा होतो, हे सर्वांना समजले असेल, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आमदारांना लगावला.विधानसभेच्या सन २०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवाराला डावलून विधानसभेचे नवनियुक्त उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना कशी उमेदवारी देण्यात आली, याचे गुपित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत फोडले. ‘आपल्याबरोबर राहिले तर कसा फायदा होतो, हे सर्वांना समजले असेल,’ असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील आमदारांना लगावला.बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाच्या ठरावावर अजित पवार बोलत होते.

‘राष्ट्रवादी काँग्रेसने सन २०१९मध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघातून बनसोडे यांच्याऐवजी सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर केली होती. उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मी गप्प बसलो. मात्र, बनसोडे यांना उमेदवारी द्यावी, असे जयंत पाटील यांना म्हणालो होते. सगळेच काही आपल्या संमतीने होत नाही, असे जयंत पाटील यांचे म्हणणे होते. पुणे जिल्हा मोठा असल्याने माझ्याकडे दोन जादा ‘एबी फॉर्म’ होते,’ असे पवार म्हणाले.’मी रात्री बाराच्या दरम्यान मुंबईहून पुण्याला जायला निघालो होतो. एक्स्प्रेस-वे संपतो तेथे बनसोडे यांना बोलावले आणि त्यांना एबी फॉर्म दिला. तसेच, सकाळी तातडीने ११ वाजता पहिला अर्ज दाखल करण्यास सांगितले.

त्या पद्धतीने त्यांनी अर्ज दाखल केला. जरा वेगळे केले असल्याची कल्पना जयंत पाटील यांना देत संमती देण्यास सांगितले. त्यावर आपले नाव कुठे सांगू नका, असे त्यांनी सांगितले. बनसोडे यांना अर्ज भरल्यानंतर सव्वाअकराच्या सुमारास शिलवंत या उमेदवारी अर्ज भरण्यास गेल्या. मात्र, त्या ठिकाणी ‘राष्ट्रवादी’चा अधिकृत अर्ज आल्याची माहिती त्यांना मिळाली,’ असा प्रसंग पवार यांनी सांगितला.विधानसभेच्या २१व्या उपाध्यक्षपदी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची बुधवारी सकाळी एकमताने निवड करण्यात आली. ‘चहा विकणारा पंतप्रधान, रिक्षा चालवणारा मुख्यमंत्री, तर टपरी चालवणारा विधानसभेचा उपाध्यक्ष होतो, हे केवळ संविधानाने संधीची समानता दिल्याने शक्य झाले,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.