सरकारकडून आझाद मैदानासंदर्भात नियमावली जाहीर, आता ‘हे’ नियम पाळावेच लागणार.

 रस्त्यांवर मोर्चा काढून वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण करत आझाद मैदानाकडे जाणे आणि आझाद मैदानातून अन्यत्र मोर्चा काढणे, यालाही प्रतिबंध असेल.आपल्या समस्यांकडे राज्य सरकार व प्रशासनांचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील राजकीय, सामाजिक संघटनांचे आंदोलनाचे मुख्य केंद्र असते आझाद मैदान. परंतु, दक्षिण मुंबईतील वाहनांची रहदारी तसेच नोकरदार व रहिवाशांच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यादृष्टीने आता राज्य सरकारने आझाद मैदानातील मोर्चे, धरणे, आंदोलने आदींविषयी अंतिम नियमावली आखली आहे. त्यानुसार, एकावेळी एकाच दिवसाच्या आंदोलनाला आणि तेही सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेतच परवानगी मिळणार आहे.रस्त्यांवर मोर्चा काढून वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण करत आझाद मैदानाकडे जाणे आणि आझाद मैदानातून अन्यत्र मोर्चा काढणे, यालाही प्रतिबंध असेल. ‘नरिमन पॉइंट अँड चर्चगेट रेसिडंट्स असोसिएशन’ने ॲड. सी. आर. नायडू यांच्यामार्फत २० वर्षांपूर्वी याचिका केल्यानंतर उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले होते. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आझाद मैदानात जमावे, असे न्यायालयीन आदेशात स्पष्ट करण्यात आले. त्याआधारेच पोलिसांकडून नियमन व्हायचे. परंतु, राज्य सरकारकडून अंतिम नियमावली करण्यात आली नव्हती. १२ सप्टेंबर २०२०च्या निर्देशाचे पालन झाले नसल्याबद्दल मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नापसंती व्यक्त केली होती.

त्या पार्श्वभूमीवर, परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी बुधवारी सरकारी वकील अभय पत्की यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यासोबत ‘सार्वजनिक सभा, आंदोलने, मोर्चे यांच्या नियमनाचे नियम-२०२५’ ही अंतिम नियमावलीही सादर केली.‘अनेक सूचना व शिफारशी लक्षात घेऊन उच्चाधिकार समितीने या महिन्यात झालेल्या बैठकीत नियमावली अंतिम केली. ही नियमावली एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल’, अशी हमी मुंढे यांनी दिली.’कोणत्याही पद्धतीचे आंदोलन वा सभेचे आयोजन करणाऱ्या आयोजकाला कमाल पाच हजार लोकांचाच जमाव जमवण्याची परवानगी असेल. तसेच आझाद मैदानातील निर्धारित क्षेत्रात आयोजनाच्या संपूर्ण काळात आयोजकाला उपस्थित राहणे बंधनकारक असेल. कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले किंवा परवानगी देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याच्या निर्देशांचे पालन केले नाही, तर आयोजकाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. महाराष्ट्र पोलिस कायद्यासह भारतीय न्याय संहिता व अन्य कायद्यांप्रमाणे कायदेशीर कारवाई लागू असेल’, असेही नियमांत म्हटले आहे.सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीविना कोणत्याही आंदोलनाला मनाई

■ संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाही; याचे उल्लंघन केल्यास कायद्याप्रमाणे तुरुंगवासाची किंवा दंडात्मक कारवाई ■ सहभागींना कमाल दोन फुटांच्या काठीला लावलेले कमाल ९ बाय ६ फुटांचे झेंडे, बॅनर सोबत आणण्याचीच परवानगी ■ सभांमध्ये प्रक्षोभक, चिथावणी देणारी भाषणे आणि विविध समाज, गट यांच्या भावना दुखावणारी व सौहार्दपूर्ण वातावरण बिघडवणारी भाषा याच्या वापरास मनाई
■ आंदोलनात सहभागींना काठ्या, तलवार, अग्निशस्त्र, ज्वालाग्रही पदार्थ आणण्यास मनाई आंदोलनकत्यांना कुठेही रहदारी अडवण्यास व अडथळा निर्माण करण्यास मनाई ■ ट्रॅक्टर, बैलगाड्या, सायकल रिक्षा, हातगाड्या, अवजड वाहने आणण्यास मनाई ■ कोणत्याही प्रकारचे प्राणी व पक्षी आंदोलनस्थळी आणण्यास मनाई

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.