“आरोप निश्चिती करु नका” Santosh Deshmukh प्रकरणात आरोपींच्या वकिलांची कोर्टात मागणी.

 संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीचा आज(२६ मार्च) पहिला दिवस. बीडच्या मकोका कोर्टात सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडसह सातही आरोपींच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितीत सुनावणीला सुरुवात झाली. विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम हे या सुनावणीला हजर होते. सुनावणीपूर्वी धनंजय देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांची भेट घेत जवळपास अर्धातास चर्चा केली.संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजच्या दिवसाची सुनावणी आता संपली आहे. हे प्रकरण आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी केला. तर, या प्रकरणात योग्य ती कागदपत्र न मिळाल्याने आरोप निश्चिती करु नका अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली आहे. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिलला होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीचा आज(२६ मार्च) पहिला दिवस. बीडच्या मकोका कोर्टात सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडसह सातही आरोपींच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितीत सुनावणीला सुरुवात झाली. विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम हे या सुनावणीला हजर होते. सुनावणीपूर्वी धनंजय देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांची भेट घेत जवळपास अर्धातास चर्चा केली.कोर्टात पोहोचल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मा. न्यायालयासमोर खंडणी घटनाक्रम मांडला. जगमित्र कार्यालयात वाल्मिक कराडने खंडणी मागितल्याचे त्यांनी सांगितले. संतोष देशमुखांना कायमचा धडा शिकवा असे विष्णू चाटे म्हणाल्याचेही त्यांनी मा. न्यायालायाला सांगितले.नोव्हेंबर २०२४ च्या २९ तारखेला विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत सगळे आरोपी हजर होते असल्याचे निकम यांनी सांगितले. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगावर विष्णू चाटे सुदर्शन घुले यांची बैठक झाली. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत अशी चर्चा या बैठकीत झाली. यावर ‘त्याला कायमचा धडा शिकवा’, असे विष्णू चाटे म्हणाल्याचे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.