क्रिकेट खेळताना चेंडू विहिरीजवळ गेला आणि अनर्थ घडला; नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या मुलाचा दुर्दैवी अंत.

 दहावीची परीक्षा देऊन मुलगा घरी आलेला. नंतर मित्रांसोबत खेळायला गेला. क्रिकेट खेळताना चेंडू विहिरीजवळ गेला आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे एका अपघातात दहावीतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. निम्बर्गी रोडलगत असलेल्या हरीश सप्ताळे यांच्या शेतातल्या विहिरीजवळ क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायं ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ओंकार चव्हाण (वय वर्षे १५) असं मृत मुलाचं नाव आहे.ओमकार हा नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आई-वडिलांकडे आला होता. सोमवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ओंकार मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. विहिरीच्या कडेला हरवलेला चेंडू शोधत असताना पाय घसरून तो खोल असलेल्या विहिरीत पडला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

क्रिकेट खेळताना मुलगा विहिरीत पडल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. सोमवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते. विहिरीत पडलेला ओंकार सापडत नसल्याने आणि विहीर खोल असल्याने तात्काळ मंद्रूप पोलीस ठाणे येथे सदर घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ मंद्रूप पोलीस घटनास्थळी आले. पोलीस आणि गावकऱ्यांनी तात्काळ मनगोळी येथील कमलाकर डिरे, अनिल सले, अजय नगरे, हर्षद कांबळे, फारुख नदाफ यांच्या मदतीने रात्री उशिरा मृत ओंकारचा शोध घेऊन त्याला बाहेर काढलं.मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विक्रम माने, पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी हे करत असल्याची माहिती मंद्रूप पोलिसांकडून देण्यात आली. शवविच्छेदन करून ओंकारचा मृतदेह बुधवारी कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. दहावीत शिक्षण घेणाऱ्या ओंकारचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओंकारच्या अशा जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, विहिरीत पडून दोन तरुणांचा नंदुरबारमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेत ट्रॅक्टरचा तोल जाऊन ट्रॅक्टर विहिरीत पडला आणि त्याखाली दबून, विहिरीत पडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला होता.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.