ठाकरे गटाला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांआधी मोठे धक्के बसत आहेत. अनेक नेते, शाखाप्रमुख व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अशातच संजय राऊत यांच्यावर उमेदवारी विकल्याचे गंभीर आरोप केले आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ठाकरे गटाला गळती लागली असून नेते, शाखाप्रमुख आणि पदाधिकारी जय महाराष्ट्र करताना दिसत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर जोरदार सुरु असल्याचं दिसत आहे. अशातच ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात जाणाऱ्या शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अनेक ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी विकली असा आरोप नगर शहर आणि तालुक्यातील शिवसैनिकांनी केला आहे.











