वाळू तस्करांच्या दोन गटात अंदाधुंद गोळीबार; 25 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल.

वाळू तस्करांच्या दोन गटात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून इतर 25 जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेय.पैनगंगा नदीपात्रात रस्त्याच्या कारणावरून वाळू तस्करांच्या  दोन गटात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना महागाव तालुक्यातील भोसा परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास घडलीय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत जलद गतीने तपास सुरू केला असता, या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून इतर 25 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या अंदाधुंद गोळीबारात  कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या अधिक तपास करत आहे. मात्र, जिल्ह्यात आचारसंहिता लागू असतांना या  रिव्हॉल्व्हर आल्या कुठून, हा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.राज्यात एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून निवडणुकांच्या दुसऱ्या टप्पातील आचारसंहिता कालपासून लागू करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलीस यंत्रणेसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. असे असतांना यवतमाळच्या पैनगंगा नदीपात्रात वाळू तस्करांच्या दोन गटात अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर  पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आली असून या प्रकरणी 4 संशयितांना अटक केली असून इतर 25 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार वाळू तस्करांच्या दोन गटात सुरू असलेल्या रस्त्याच्या कारणावरून हा गोळीबार करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. मात्र दोन गटात असलेल्या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी रेती तस्करांनी गोळीबार केल्याचीही माहीती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक, दारव्हा आणि उमरखेड उपविभागीय पोलीस  तसेच इतर अधिकाऱ्यांसह  आर्णी-महागांव पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत प्रकारणाचा तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना घटनास्थळी चार रिकामे काडतूस आणि दोन जिवंत काढतूस आढळून आले. सोबतच या प्रकरणी दोन्ही गटातील अज्ञातांनी  एक स्विफ्ट डिझायर, टिप्पर आणि इतर वाहनांची मोठी तोडफोड देखील केली आहे. बोळीबार झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळावरुन पळ काढला असून त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. मात्र, आचारसंहितेत रिव्हॉल्व्हर आल्या कुठून, हा प्रश्न या निमित्याने उपस्थित करण्यात आला आहे. सोबतच या घटनेनंतर महसूल विभागाकडून हे वादग्रस्त रेती घाट आता सील करणार का या कडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.