रेल्वेखाली झोकून देऊन आयुष्य संपवणाऱ्या संतोष गोरे मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, कॉलेजमधील 34 जणांवर गुन्हा दाखल.

यवतमाळच्या महिला महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक यांनी मालगाडीखाली केलेल्या आत्महत्या प्रकरणात कॉलेजमधील 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळच्या लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक संतोष गोरे यांनी जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे मालगाडीखाली आत्महत्या केली होती. यावेळी सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्य, सहकारी प्राध्यापक व इतर असे  34 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडनेरा रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मृत प्राध्यापक संतोष गोरे यांचे मामेभाऊ शशिकांत भट यांनी बडनेरा रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.यात मृत्यू पूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये असलेले 34 जण मला खूप मानसिक त्रास देत आहे, हा त्रास आता माझ्या सहनशक्ती पलीकडे गेलेला आहेत. त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. असे या या सुसाईड नोट मध्ये लिहलं होतं.

या प्रकरणी सुसाईड नोटमध्ये असलेले 34 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील जयनगर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची गंभीर दखल घेत शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी शाळेलाच कुलूप ठोकले आहे. मुख्याध्यापक जितेंद्र मंडळ आणि शिक्षिका कोमल साखरे शाळेतच विद्यार्थ्यांपुढे अश्लील चाळे करतात आणि बघणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करतात.

या घटनेच्या निषेधार्थ म्हणून दोघांनाही सेवेतून बडतर्फ होईपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षिका शाळेत नेहमी अश्लील चाळे करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांनी केला आहे.वाशिमच्या रिसोड ते लोणार मार्गावरील मोरगव्हाण गावाजवळ स्कॉर्पिओ आणि जेसीबीमध्ये  अपघात झाला असून या अपघातात 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओ लोणार तालुक्यातील पांग्राडोळे येथिल असून स्कार्पिओ लोणारच्या दिशेने  जात असताना उभ्या जेसीबीला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामधील गंभीर जखमींना  दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.