पत्नीचा ‘तो’ बनाव फसला; महिलेच्या भयंकर कृत्याने पोलिसही हैराण, काय घडलं.

 पत्नीने पतीची हत्या करुन त्याला फासावर लटकवत पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांना संशय आला आणि महिलेचं भयंकर कृत्य समोर आलं. देशभरात हत्येच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. दररोज कुठे ना कुठे हत्येच्या, मारामारीच्या घटना समोर येत आहेत. अशात अशीच एक भयंकर घटना समोर आली असून या घटनेने पोलिसही हैराण झाले आहेत. पण पोलिसांनी केवळ २४ तासात या घटनेचं गूढ उकललं.एका पत्नीने आपल्या पतीचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर पत्नीने ही घटना आत्महत्या असल्याचा बनाव रचला. महिलेने पतीला फाशी घेतलेल्या अवस्थेत फासावर लटकवलं, जेणेकरुन पतीने आत्महत्या केल्याचं भासवलं जाईल. पण पत्नीचा हा बनाव फसला. झारखंडमधील गिरिडीह या भागात ही घटना घडली आहे.शनिवारी सकाळी मिथलेश कुमार नावाचा तरुण त्याच्या राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत तात्काळ पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत होते.

तपासावेळी पोलीस मृत व्यक्तीच्या पत्नीची कुमकुम देवीची चौकशी करत होते. कुमकुमने पोलिसांना सांगितलं, की तिचा पती नशेच्या आहारी गेलेला होता. तो सतत तणावात असायचा. शुक्रवारी रात्री जेवल्यानंतर तो झोपायला गेला. सकाळी ज्यावेळी त्याच्या खोलीत गेली, त्यावेळी दरवाजा उघडला नाही. बाहेरुन पाहिल्यानंतर पती फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला.मृत व्यक्तीच्या पत्नीने अशी माहिती पोलिसांना दिली पण पोलिसांना तिच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांकडून अधिक सखोल तपास सुरू झाला.

त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. पोलिसांना आजूबाजूच्या चौकशीत काही संशयास्पद, धक्कादायक माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी पुन्हा महिलेची कसून चौकशी केल्यानंतर तिने तिचा गुन्हा कबूल केला. तिने पतीची आधी हत्या करुन नंतर ही हत्या आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. पतीला ठार करुन त्याचा मृतदेह फासावर लटकवला, पण हा बनाव फसला. पत्नीने केलेल्या हत्याकांडने पोलिसही हैराण आहेत. पोलिसांनी घटनेच्या केवळ २४ तासांत या हत्येचं गूढ उकललं आणि आरोपी पत्नीला ताब्यात घेतलं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.