मुलाला शाळेत सोडायला निघाले, वाटेत कारची धडक, लेकासमोरच आई-वडिलांचा हादरवणारा अंत, सोलापूर हळहळलं.

सोलापुरात मुलाला शाळेत सोडायला जाताना झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. हे दोघे आपल्या मुलाला शाळेत सोडायला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात काळीज चिरणारी घटना घडली आहे. पिकअप आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन एक भीषण अपघात झाला. मुलाला शाळेत सोडायला दुचाकीवरून निघालेल्या पती-पत्नीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला असल्याती माहिती आहे. हा अपघात सांगोला – शिरभावी रस्त्यावर इंगळेपाटी पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. धनंजय तुकाराम क्षीरसागर (वय ५०) आणि पत्नी सुवर्णा धनंजय क्षीरसागर (वय ४४, रा. शिरभावी, ता. सांगोला, सध्या चिंचोली रोड, सांगोला) असे अपघातात मृत्युमुखी झालेल्या दाम्पत्याची नावं आहेत.

धनंजय क्षीरसागर हे महाराष्ट्र बँक, शिरभावी येथे कॅशिअर म्हणून कार्यरत होते.धंनजय क्षीरसागर यांचा मुलगा शिरभावी येथे हायस्कूलमध्ये शिकत आहे. सकाळी मुलाला शाळेत लवकर ज्यादा तास असल्यामुळे धंनजय क्षीरसागर सांगोल्याहून शिरभावीकडे दुचाकीवर मुलाला सोडण्यासाठी निघाले होते. पत्नी सुवर्णा क्षीरसागर या देखील त्यांच्यासोबत होत्या. इंगळेपाटी पेट्रोल पंपाच्या शेजारी अचानक त्यांची दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, धंनजय आणि सुवर्णा क्षीरसागर या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचा मुलगा ब्रह्म हा गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच मयताचे चुलत भाऊ गणेश दत्तात्रय कमलापूरकर आणि धोंडिराम दत्तात्रय कमलापूरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना धनंजय आणि सुवर्णा क्षीरसागर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच पती-पत्नीला मृत घोषित केले. तर अपघातात गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा ब्रह्म धनंजय क्षीरसागर यांना सांगोल्याहून पुढील उपचारासाठी मिरजला दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस अपघाताचा तपास करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.