भयंकर! हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, चार शेतकरी जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक.

शेतात हळद शिजवताना अचानक स्फोट झाल्याने चार शेतकरी जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. शेतकऱ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. यातील एका शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे.नांदेडमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. शेतात हळद शिजवताना कुकरचा अचानक स्फोट होऊन चार शेतकरी जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील आष्टी शिवारात ही धक्कदायक घटना घडली. हा स्फोट इतका मोठा होता की कुकरचे काही भाग एक ते दीड किलोमीटर पेक्षाही दुरवर जाऊन पडले होते. घटनेत जखमी झालेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमीमध्ये विश्वनाथ इंद्रवाड, दत्ता इंद्रवाड, देविदास खंदारे आणि अन्य एक शेतकऱ्याचा समावेश आहे. त्यातील एका शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे.

राज्यात सध्या सर्वत्र हळद काढणीला सुरुवात झाली आहे. त्यात अनेक शेतकरी आपल्या शेतात हळद शिजवण्यात व्यस्त आहेत. हदगाव तालुक्यातील आष्टी येथील शेतकरी बंडू म्हेत्रे यांच्या शेतात सकाळ पासून हळद शिजवण्याचे काम सुरु होते. काही शेतकरी एका मोठ्या कुकरमध्ये हळद शिजवू लागले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुकरमध्ये हळद शिजवत असताना अचानक कुकरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट एव्हढा मोठा होता की कुकरचे काही भाग एक ते दिड किलोमीटर पेक्षाही दुरवर जाऊन पडले. शिवाय संपूर्ण परिसर स्फ़ोटाचा आवाजाने हादरुन गेला होता.कुकरजवळ असणारे चौघे गंभीर जखमी झाले.

यामध्ये दोघांना विश्वनाथ इंद्रवाड, दत्ता इंद्रवाड, देविदास खंदारे फ्रॅक्चर झाले तर इतरांना गंभीर मार लागला. शिवाय त्वचा भाजली. स्फोटाच्या आवाजामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी तात्काळ जखमी शेतकऱ्यांनाआष्टी येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत कवळे यांनी जखमीवर उपचार केले. विश्वनाथ इंद्रवाड, दत्ता इंद्रवाड, देविदास खंदारे यांना अधिक मार लागल्याने त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेने हदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी हळद शिजवताना काळजी घेण्याचे आवाहनही स्थानिक नेतृत्वाकडून करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.