कोकणात अवकाळी पाऊस, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आंबा, काजू बागायतदार चिंतेत.

कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत पडला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली.कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा अवकाळी पाऊस पडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लांजा, पाली, देवरुख परिसरात, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार्ग परिसरात हा अवकाळी पाऊस झाला आहे. कणकवली येथेही काही ठिकाणी पाऊस झाला आहे. अवकाळी पावसाने आंबा, काजू बागायतदार धास्तावला आहे.दिवसभर उकाड्याने हैराण होत असताना मंगळवारी, २५ मार्च रोजी रात्री रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक ढगांचा गडगडाट होऊन रत्नागिरी तालुक्यातील पाली, खानू, वळके, चरवेली, नाणीज या भागात अवकाळी पाऊस कोसळू लागला. या पावसाने उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी आंबा, काजूसह कोकणी रानमेवाचं मात्र हा अवकाळी पाऊस नुकसान करणार आहे.

यंदा आंब्याचं पीक कमी असताना आधीच अडचणीत सापडलेला बागायतदार अवकाळी पावसामुळे मात्र चिंतेत पडला आहे.यंदा आधीच आंबा हा जवळपास ३० ते ४० टक्के इतकाच असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच अवकाळी पावसाने रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्हातही काही ठिकाणी अवकाळीने दाणादाण उडवल्याने बागायतदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पावसामुळे आंबा, काजू बागायतदार मोठ्या संकटात, चिंतेत सापडला आहे. हा पाऊस अवकाळी असल्याने फळ बागायतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रात्री उशिरा संगमेश्वर देवरुख परिसरात तसेच गणपतीपुळे परिसरातही जोरदार पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी दोडामार्ग परिसरातही जोरदार पाऊस झाला आहे.

अवकाळी झालेल्या पावसाने अनेकांची त्रेधातिरपीट उडवली आहे. तळ कोकणात पावसामुळे हातातोंडाशी आलेला आंबा, काजू या महत्त्वाच्या पिकांसह कोकणातील इतर रानमेवा अडचणीत सापडला आहे. दरवर्षी आंबा बागायतदारांसमोर बदलत्या लहरी हवामानामुळे मोठं संकट उभं राहू लागलं आहे.दरम्यान, पाली बाजारपेठेत मुंबई, गोवा आणि मिऱ्या नागपूर या दोन्हीही राष्ट्रीय महामार्गावरील कामे सुरू असल्याने काही ठिकाणी रस्त्यावर चिखल झाला आहे. दिवसभर कोकणात उष्णतेने हैराण झालेल्यांना या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस झाला असून सातारा, कोल्हापूरमधील काही भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.