पालिकेच्या पथकावर दगडफेक, दोन कर्मचारी गंभीर जखमी.

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल भागात गायरान जमिनींवरील अतिक्रमण काढण्याच्या प्रयत्नात दगडफेकीची घटना घडली असून दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे बघायला मिळतंय.हर्सूल येथील गट क्रमांक २१६ व २१७ मधील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे हटविल्यानंतर जागेच्या सपाटीकरणासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर मंगळवारी तेथील जमावाने दगडफेक केली. यात पथकातील दोन कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणात हर्सूल पोलिस ठाण्यामध्ये जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेला हर्सूल येथील गट क्रमांक २१६ व २१७मधील अडीच एकर जागा दिली आहे, परंतु या जागेवर अतिक्रमण असल्यामुळे ते हटवण्यासाठी पालिका प्रशासनाने तेथील नागरिकांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने सोमवारी कारवाई करून १८० अतिक्रमणे पाडन टाकली.यावेळी नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता, नागरी मित्र पथकाने तो हाणून पाडला. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२५ मार्च) सकाळी साडेअकराला पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक अश्विनी कोथळकर यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटविण्यात आले होते त्या ठिकाणी पोहोचले. नागरिकांनी आपले साहित्य काढून घ्यावे व जागा रिकामी करावी, जागेचे सपाटीकरण करायचे आहे असे आवाहन ध्वनिक्षेपकावरुन पालिकेच्या पथकातील कर्मचारी करीत होते.

एवढ्यात एक जमाव या पथकाच्या दिशेने धावून आला आणि त्याने दगडफेक सुरू केली. दगडफेकीत नागरी मित्र पथकातील माजी सैनिक गजानन चितळे यांचे डोके फुटले, रामेश्वर निकम यांच्या पायाला मार लागला. जमाव चालून येत असल्याचे लक्षात येताच पथकाने काढता पाय घेतला. त्यानंतर हसूल पोलिस ठाण्यात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.छत्रपती संभाजीनगर शहरावरील पाण्याचे संकट कायम आहे. ३८ तासांचा शटडाऊन संपल्यावर ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी निखळली, या जलवाहिनीची दुरुस्ती अद्याप झालेली नसताना फारोळा फाटा येथे १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह फुटला, त्याच्या दुरुस्तीला बारा तास लागले. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला. दरम्यान शहरातील अनेक भागांमध्ये आठ दिवसांपासून निर्जळी आहे. नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.