नाशिकातील विभागीय आयुक्तपद आणि जिल्हाधिकारीपदाच्या बनावट नियुक्तीच्या प्रकरणात सुमारे साडेआठ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतयाने पैसे गोळा केले होते. संशयित रिंकल नरेश रजकला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने रो हाऊस बांधून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे गोळा केले होते.नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी तसेच जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्याचे सांगून साडेआठ लाखांची फसवणूक करणाऱ्या तोतयास शहर पोलिसांनी अटक केली. रिंकल नरेश रजक उर्फ अब्दुल रहेमान ( ३७, मूळ रा. नाहर माता रोड गरद ग्वाल्हेर, मध्य प्रदेश, ह. मु. महेश नगर, मालेगाव) असे संशयिताचे नाव आहे. संशयितास मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला शनिवारपर्यंत (दि. २९) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.|
शासनाकडून ९९ वर्षांच्या कराराने जागा देण्यात येणार असून, त्या ठिकाणी रो हाऊस उभारण्यात येणार आहे, एक लाख २० हजार रुपये प्रमाणे एक रो हाऊस देण्यात येईल, असे सांगून संशयित रिंकल नरेश याने नागरिकांकडून पैसे गोळा केले होते. याप्रकरणी अन्सारी मोहम्मद फैजान मोहम्मद जलाल (रा. इस्लामपुरा) यांनी फिर्याद दिली. सहायक निरीक्षक एन. जे. गायकर अधिक तपास करीत आहेत.संशयित रिंकल नरेश रजक हा मालेगावात अलिशान कारने फिरत होता. त्याच्या कारवर ‘डीसी’ असे नाव लिहिलेले आहे. त्याच्या घरझडतीत पोलिसांना लाखो रुपये आढळून आले आहेत. तसेच समाजातील प्रतिष्ठित व आर्थिक स्थैर्य प्राप्त असलेल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांना तो आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम करीत होता.










