२५ तोळे सोने,चार लाख रोकड घेऊन पळणाऱ्या दरोडेखोरांची पोलिसांनी केली सिनेस्टाईलने धरपकड.

शस्त्राचा धाक दाखवून गणेश काळबांडे यांच्या पत्नी आणि सासूला बांधून २५ तोळे सोन्याचे दागिने आणि चार लाखाची कॅश जबरीने हिसकावून पसार झाले. दरम्यान काळबांडे कुटूंबीयांनी आरडाओरड केला असता, परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.या घटनेची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती.यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरातील बारीपुरा परिसरात भरदिवसा दरोडेखोरांनी सासू-सुनेला बांधून शस्त्राचा धाक दाखवत २५ तोळे सोन्यासह चार लाखांची कॅश हिसकावली. ही घटना २५ मार्चला दुपारी १ वाजताच्या सुमारास राम मंदीर परिसरात घडली. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. ही बाब दारव्हा पोलिसांना कळताच त्यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला माहिती दिली. संयुक्त मोहीम राबवत खंडाळा पोलिसांनी दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत शेंबाळपिंपरी परिसरात स्कॉर्पिओ वाहनासह पाच दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे.

येथील बारीपुरा राम मंदीराजवळ किराणा व्यापारी गणेश काळबांडे वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास गणेश काळबांडे यांच्या घरी पत्नी आणि सासु होती. अश्यात अचानक एका स्कॉर्पिओ वाहनातून उतरत सात दरोडेखोर त्यांच्या घरात शिरले. त्यांनतर शस्त्राचा धाक दाखवून गणेश काळबांडे यांच्या पत्नी आणि सासूला बांधून २५ तोळे सोन्याचे दागिने आणि चार लाखाची कॅशजबरीने हिसकावून पसार झाले. दरम्यान काळबांडे कुटूंबीयांनी आरडाओरड केला असता, परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.या घटनेची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दारव्हा पोलीसांनी घटनास्थळ गाठले.

उपविभागीय पोलीस अधिकारी व अन्य पोलीस पथकांनी घटनास्थळी भेट दिली.दारव्हा येथे दरोडा टाकुन पसार झालेल्या दरोडेखोरांना अटक करण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र नांकाबंदी करण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेसह अन्य पोलिस पथक विविध ठिकाणी रवाना झाले होते. दरम्यान पोलीस आपल्या मागावर असल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शेंबाळपिंप्री शिवारात आपले वाहन उभे केले. तेथून शेतातून पसार होण्याच्या मार्गावर असताना खंडाळा पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करुन आरोपींना जेरबंद केले. यात आरोपी अश्रफ परवेज खान, महेश रामप्रसाद पिंपरणे, आदर्श देवीसिंग बिडला, कार्तीक रमेश डुलकेजा, गणेश शाम कोटूरवार सर्व रा. नांदेड अशी आरोपींची नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.