सतीश भोसले उर्फ खोक्या याला शिरुर न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात जाण्यापूर्वीच त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा कथित व्हिडिओ वायरल झाला.बीड जिल्हा कारागृहाच्या बाहेर सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाई याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. त्याबरोबरच ठाणेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दोघा कर्मचाऱ्यांसह इतर अधिकारी दोषी (Beed Crime) असतील, तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे.











