दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांची कायदेशीर बाजू मांडणाऱ्या वकील निलेश ओझा यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांची कायदेशीर बाजू मांडणाऱ्या वकील निलेश ओझा यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांचे वकील ओझा यांनी माध्यमांशी संवाद साधत काही सनसनाटी दावे केले आहेत.दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत. आदित्य ठाकरेंकडून घडलेल्या गुन्ह्यावर पांघरुन घालण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा दुरुपयोग केला. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप ओझा यांनी केला. या प्रकरणात दिशाच्या कुटुंबियांना ५ वर्षांनी जाग आली का, असा सवाल करणाऱ्यांनाही ओझा यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘११ डिसेंबर २०२३ रोजी सतीश सालियन यांचा जबाब एसआयटीनं नोंदवला.











