सोलापुरात बदलापूर; चार वर्षांच्या चिमुकलीला बाथरुममध्ये नेलं, नको त्या ठिकाणी चिमटे, शाळेतील संतापजनक प्रकार.

 सोलापुरात एका खाजगी शाळेतील कर्मचाऱ्याने चार वर्षांच्या चिमुरडीचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं आहे.बदलापूर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरवून टाकले होते. बदलापूर प्रकरणात जशी घटना घडली होती, तशीच घटना सोलापूर शहरातील एका खाजगी शाळेत घडली आहे. ज्यूनीयर केजी वर्गात शिक्षण घेणाऱ्या चार वर्षीय बालिकेवर त्याच शाळेतील नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत सोलापूर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनाला सुन्न करणारी घटना सोलापूर शहरातील एका खाजगी शाळेत घडल्याने खळबळ उडाली आहे.

बदलापूर प्रकरणाची धग आजही कायम असताना, सोलापुरात एका खाजगी शाळेतील ५५ वर्षीय नराधम कर्मचाऱ्याने लज्जास्पद कृत्य केले आहे.ज्युनियर केजीत शिक्षण घेणाऱ्या चार वर्षीय बालिकेवर त्याच शाळेतील ५५ वर्षीय कर्मचाऱ्याने घृणास्पद कृत्य केले आहे. नराधम पीडित बालिकेला गोड बोलून बाथरूममध्ये घेऊन गेला आणि नको त्या ठिकाणी तिला चिमटे घेतले, तसेच नको त्या ठिकाणी स्पर्श केला. पीडित बालिकेने याबाबत पालकांना माहिती दिल्यावर पालकांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली आहे. सोलापूर शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला आहे. सिसिटीव्ही फुटेज तपासणी केली जात आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले आहे.पीडित बालिका ही अत्यंत कमी वयाची आहे. तिच्या पालकांनी सोलापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सोलापूर पोलीस सखोल तपास करत आहेत. याबाबतची फिर्याद २४ मार्च रोजी दुपारी दाखल झाली आहे. गुन्हा दाखल झालेल्या नोंदी नुसार संशयित नराधम आरोपीने १ डिसेंबर २०२४ पासून पीडित बालिकेचा विनयभंग केल्याची नोंद झाली आहे. भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ८, १०, १२ प्रमाणे नोंद झाली आहे. सोलापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने सोलापुरात संतापाची लाट उसळली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.