नाशिकरांनो सावधान! तुम्ही खाताय ते पनीर बनावट तर नाही ना? अंबड परिसरात २३९ किलो पनीर जप्त.

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंबड येथील मे. साई एंटरप्रायजेस, प्लॉट क्रमांक ३०८, साईग्राम कॉलनी या कारखान्यात बनावट पनीर विक्रीसाठी येणार होतेगुढीपाडवा, तसेच रमजान ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी (दि. २४) टाकलेल्या धाडीत अंबड येथून बनावट पनीरचा मोठा साठा जप्त करून नष्ट केला. सणासुदीत पनीर, खवा, मावा आदी खाद्यपदार्थांना मोठी मागणी असते. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना दर्जेदार, सकस अन्नपदार्थ मिळावेत यासाठी ‘एफडीए’ने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंबड येथील मे. साई एंटरप्रायजेस, प्लॉट क्रमांक ३०८, साईग्राम कॉलनी या कारखान्यात बनावट पनीर विक्रीसाठी येणार होते.

विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाड टाकून दुकानांमध्ये विक्रीसाठी तयार केलेला बनावट पनीरचा २३९ किलोंचा साठा जप्त केला.जप्त करण्यात आलेला पनीरचा साठा नाशवंत असल्याने तो खाण्याच्या उपयोगात येऊ नये यासाठी नीळ टाकून महापालिकेच्या घंटागाडीत टाकून नष्ट करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे, सुहास मंडलिक यांनी विनोद धवड, सहाय्यक आयुक्त (अन्न) यांच्या उपस्थितीत,

महेश चौधरी, सहआयुक्त (अन्न) नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.जप्त करण्यात आलेल्या पनीरचा नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून, विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. ‘एफडीए’ची पथके शहरातील पनीर उत्पादक व विक्रेते यांच्यावर लक्ष ठेवणार असून, कोठेही अचानक तपासणी करण्यात येणार आहे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.