नाशिक पोलिस आयुक्तालयात रिक्त पदांसाठी भरती; ३१ मार्चपर्यंत अर्ज करता येणार.

दोन्ही पदांसाठी अकरा महिन्यांच्या करारावर नेमणूक करण्यात येईल. कामगिरी समाधानकारक असेल, तर गरजेनुसार फक्त तीन वेळा संबंधितांचे कंत्राट वाढविण्यात येईल. करार कालावधीत वकील व्यवसायासंदर्भात खासगी कामे लेखी परवानगी शिवाय करता येणार नाही, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, दोन्ही पदांसाठी स्वतंत्ररित्या ५० गुणांची लेखी परीक्षा, तर २५ गुणांची मुलाखत होईल. दोन्ही परीक्षांच्या एकूण गुणांनुसार गुणतालिका तयार करून साठ टक्के गुणांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर असलेल्या परिमंडळांसह विविध विभाग व पोलिस ठाणेनिहाय कायदे व न्यायालयीन स्वरुपाच्या कामकाजासाठी विधी अधिकारीपदाच्या दोन रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कंत्राटी स्वरुपाच्या नियुक्तीसाठी ३१ मार्चपर्यंत प्रत्यक्ष टपालाद्वारे अर्ज सादर करण्याची सूचना आयुक्तालयाने केली आहे. त्यासंदर्भातील माहिती पोलिस आयुक्तालयाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.नाशिक पोलिस आयुक्तालायच्या मुख्यालय विभागाने विधी अधिकारी पदासंदर्भातील भरती जाहीर केली आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीने शासकीय सेवेत असताना प्रत्यक्षपणे विधीविषयक कामकाज हाताळले असेल. यासह गुन्हेगारी, सेवा, कायदे व प्रशासकीय क्षेत्राचे सखोल ज्ञान असेल.

त्या व्यक्तीचा अनुभव ग्राह्य धरून निवडीसाठी पात्र ठरविण्याचा विचार करण्यात येईल.दरम्यान, दोन्ही पदांसाठी अकरा महिन्यांच्या करारावर नेमणूक करण्यात येईल. कामगिरी समाधानकारक असेल, तर गरजेनुसार फक्त तीन वेळा संबंधितांचे कंत्राट वाढविण्यात येईल. करार कालावधीत वकील व्यवसायासंदर्भात खासगी कामे लेखी परवानगी शिवाय करता येणार नाही, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, दोन्ही पदांसाठी स्वतंत्ररित्या ५० गुणांची लेखी परीक्षा, तर २५ गुणांची मुलाखत होईल. दोन्ही परीक्षांच्या एकूण गुणांनुसार गुणतालिका तयार करून साठ टक्के गुणांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल.पंचवीस हजार मासिक वेतन व तीन हजार दूरध्वनी-प्रवास खर्च विधी अधिकारी (१ पद) : वीस हजार मासिक वेतन व तीन हजार दूरध्वनी-प्रवास खर्च उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनदधारक असावा,

वकील व्यवसायाचा किमान पाच वर्षांचा अनुभव अनिवार्य, गुन्हेगारी, सेवा, प्रशासकीय यासह सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती व विभागीय चौकशीचे ज्ञान असावे, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे, नेमणूक पूर्णत: कंत्राटी स्वरुपात; शासकीय अधिकारी-कर्मचारी म्हणून गणना नाही, पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील परिमंडळे व विभागांमध्ये काम करणे बंधनकारककामकाजाचे स्वरूप… कायदेविषयक व न्यायालयीन प्रकरणात सल्ला देणे, सेवा, प्रशासकीय प्रकरणांसह विभागीय चौकशीत समकालीन कायद्याची स्थिती, सल्ला देत प्रकरणे हाताळणे, प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी सरकारी अभियोक्ताकडे पाठपुरावा करणे, शासन प्रतिवादी आहे, त्या प्रकरणात सादर करायची प्रतिज्ञापत्रे संबंधित अधिकाऱ्याच्या मदतीने तयार करणे, शासनाच्या विरोधात निकाल आल्यास संबंधित प्रकरणांत निर्णयाचा अभ्यास करुन अपिल दाखल करण्यासाठी योग्य कार्यवाही करणे, पोलिस ठाण्यात ‘एफआयआर’ नोंदविण्यासाठी मदत करणे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.