पतीकडून अनैसर्गिक संबंध, सासऱ्यांकडून शारीरिक अत्याचार, पीडित विवाहितेची पोलिसांत धाव; बारामतीतील धक्कादायक घटना.

पतीने बळजबरीने अनैसर्गिक संबंध ठेवले, तर सासऱ्याने जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार २५ वर्षीय विवाहितेने बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.पतीने बळजबरीने अनैसर्गिक संबंध ठेवले, तर सासऱ्याने जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार २५ वर्षीय विवाहितेने बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत शहरातील जळोची भागात राहणारा तिचा पती, सासू व सासरा तसेच दोन नणंदा यांच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेचा जानेवारी २०२२ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्या लोकांकडून तिला १० तोळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी करण्यात आली. त्यासाठी तिचा सातत्याने छळ केला गेला. तू पांढऱ्या पायाची आहेस, काहीही झाले तरी तुला प्रॉपर्टीची मालकीन होऊ देणार नाही. दागिने आण अन्यथा तुला पळवून लावू आणि माझ्या भावाची मुलगी लग्न करून आणू, असे म्हणत सासूने वारंवार छळ केला.पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले.

तिने नकार देण्याचा प्रयत्न केला असता तिला मारहाण करण्यात आली. तिच्या दोन्ही नणंदा फोन करून सासूला तिच्या विरोधात भडकवू लागल्या. एप्रिल २०२३ मध्ये तिने माहेरी मुलाला जन्म दिला. तत्पूर्वी सासरच्यांकडून गर्भपात करण्यासाठी दबाव देखील टाकला जात होता.१० जानेवारी २०२४ला पती घराबाहेर असताना सासऱ्याने तिच्या खोलीत येत तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले. ‘याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन,’ अशी धमकी दिली. तिने ही गोष्ट सासूला सांगितली असता तिने, ‘तू शांत राहा, कोणाला काही सांगू नको,’ असे म्हटले. पतीने तिला दारू पिऊन येत सातत्याने शिवीगाळ, दमदाटी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.