समर्थ कुठे गेला? मुळा मुठा कालव्यात पोहताना पोरं शोधू लागली, सातवीतील लेकराचा बुडून मृत्यू.

मुळा-मुठा कालव्यात तो मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरला होता. त्याला नीट पोहता येत नव्हते. त्यातच वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला.हडपसर, सातववाडी येथील नवीन मुळा-मुठा कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी मुलगा पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो वाहून गेला होता. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी दोन दिवस अथक प्रयत्न करूनही मृतदेह मिळून येत नव्हता. अखेर तिसऱ्या दिवशी यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत कालव्यात मुलाचा मृतदेह मिळून आला. पुण्यातील या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

समर्थ अमोल यादव (वय १३, रा. सर्वे नंबर ८, महात्मा फुलेनगर, सातववाडी, हडपसर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ हा साधना विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. शनिवारी सातववाडी येथील ग्रामदैवत बापुजी बुवा मंदिरालगत मुळा-मुठा कालव्यात तो मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरला होता. त्याला नीट पोहता येत नव्हते. त्यातच तो पाण्यात बुडाला.त्याच्या सोबतीच्या मित्रांनी समर्थ दिसत नसल्याने आरडाओरडा सुरू केला. जवळील नागरिकांनी पाण्यात उड्या मारून शोध घेतला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो मिळून आला नाही.

काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले. त्यांनी दोन दिवस शोध घेतला. मात्र, समर्थ सापडला नाही.तिसऱ्या दिवशी यवत जवळील बोरी आंदी येथे कालव्यात सकाळी मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगत आल्याचे दिसून आले. यवत पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना बोलावून मृतदेह ताब्यात दिला.दुसरीकडे, विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे घडली. या प्रकरणी सोमवारी (दि. २४) नांदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अक्षय खैरनार असे मृत तरुणाचे नाव आहे. कृष्णाई मंगल कार्यालयात अक्षय खैरनार काम करत असताना विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाने तो सुपरिचित होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.