न्यायमूर्ती यशवंत वर्मांवर कारवाईचा बडगा; बदलीवर ‘कॉलेजियम’चे शिक्कामोर्तब, कुठे झाली बदली.

न्यायमूर्ती वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयातून बदली करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने घेतला.निवासस्थानी मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने वादात अडकलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर न्यायपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्याकडील न्यायालयीन कामकाज काढून घेण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला, तर त्यांची बदली करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी शिक्कामोर्तब केले.अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशननने आक्षेप घेतल्यानंतरही न्यायमूर्ती वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने घेतला. न्यायमूर्ती वर्मा यांच्या बदलीची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली असून, यासंबंधीचा ठराव सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसृत करण्यात आला आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २० आणि २४ मार्चच्या बैठकीत न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेतला’, असे या ठरावात म्हटले आहे.तत्पूर्वी, पुढील आदेशापर्यंत न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडील न्यायालयीन कामकाज काढून घेण्यात आले आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाच्या कामकाज सूची निबंधकांनी प्रसृत केलेल्या नोटिशीत नमूद केले.

न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडे कोणतेही न्यायालयीन कामकाज सोपवू नये, असे निर्देश सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांना दिले होते. विक्री कर, वस्तू व सेवा कर, कंपनी अपील्स यासंदर्भातील खटले वर्मा यांच्या खंडपीठापुढे होते. आता त्यांच्या खंडपीठापुढील खटले न्या. सुब्रह्मण्यम प्रसाद आणि न्या. हरीश वैद्यनाथन यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. तर तृतीय खंडपीठाचे नेतृत्व न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांच्याकडे असणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.