फसवणूक, छळ अन् मुलाच्या ताब्याचा वाद; टेक उद्योजकाचे पत्नी आणि पोलिसांवर गंभीर आरोप.

घटस्फोट आणि ​मुलाच्या कस्टडीच्या ​कायदेशीर लढाईत ​भारतीय टेक उद्योजक​ प्रसन्न शंकर यांनी त्यांच्या पत्नीवर छळ केल्याचा आरोप केला. ट्विटच्या​ मालिकेत, ​शंकर यांनी त्यांच्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे कळल्यानंतर घडलेल्या​ घटनांचे वर्णन केले​ पण​, ​हा भारतीय ​टेक उद्योजक कोण ​तरी आहे. तामिळनाडूमधून एका हाय-प्रोफाइल घरगुती वादाचे प्रकरण समोर आले आहे. सिंगापूरस्थित क्रिप्टो सोशल नेटवर्क या सॉफ्टवेअर कंपनी रिप्लिंगचे संस्थापक आणि टेक उद्योजक प्रसन्न शंकर यांनी त्यांच्या पत्नी आणि चेन्नई पोलिसांवर त्यांचा छळ केल्याचा आरोप केला आहे. प्रसन्ना यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून आपली वेदना व्यक्त केली आहे. खोट्या तक्रारींच्या आधारे त्यांना त्रास दिला जात असल्याचा प्रसन्ना यांनी आरोप केला.घटस्फोट आणि मुलाच्या ताब्याच्या लढाईदरम्यान तंत्रज्ञान (टेक) उद्योजक प्रसन्न शंकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. प्रसन्ना यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांची पत्नी आणि चेन्नई पोलिस त्यांना त्रास देत असल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी, त्यांच्या पत्नीने दावा खोटा म्हणून आरोप फेटाळले खोटे बोलून त्यांनी तिला अमेरिकेहून भारतात बोलावले आणि त्यांच्या मुलाला घेऊन गेला.चेन्नई येथील टेक उद्योजक प्रसन्ना शंकर यांनी अलीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांची कहाणी शेअर केली.

अभियंत्याने पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आणि एका पोस्टमध्ये पत्नीपासून वेगळे राहत असल्याचे सांगितले. शंकर म्हणाले की त्यांच्या पत्नी आता घटस्फोटासाठी मोठी रक्कम (पोटगी) मागत आहे.प्रसन्ना शंकर उर्फ प्रसन्ना शंकरनारायणन सध्या सिंगापूरमध्ये राहणारे भारतीय वंशाचे उद्योजक आहेत. एक अत्यंत कुशल स्पर्धात्मक प्रोग्रामर, प्रसन्ना यांना महाविद्यालयीन काळात भारतातील टॉप कोडर म्हणून स्थान देण्यात आले होते. त्यांनी टॉपकोडर आणि गुगल कोड जॅम सारख्या प्लॅटफॉर्ममध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) त्रिचीचे माजी विद्यार्थी असलेल्या त्यांनी २००४ ते २००८ दरम्यान संगणक शास्त्रात बॅचलर पदवी मिळवली, जिथे त्यांची पत्नी दिव्या शशिधर हिच्यासोबत भेट झाली.शंकर यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला गुगल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये काम केले व नंतर लाईकअलिटल या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मची सह-स्थापना केली.शंकर इथपर्यंतच थांबले नाही तर नंतर रिपलिंगची सह-स्थापना करण्यापूर्वी जेनेफिट्स या HR सॉफ्टवेअर कंपनीत अभियांत्रिकी संचालक बनले.

त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी २०२० मध्ये रिपलिंग सोडले आणि २०२३ मध्ये सिंगापूर-स्थित क्रिप्टो-केंद्रित सोशल नेटवर्क, ०xPPL, लाँच केले.प्रसन्न शंकर यांचा जन्म चेन्नई येथे झाला आणि त्यांनी एनआयटी त्रिची येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक कंपनी उघडली, त्यानंतर अमेरिकेत गेले. शंकर यांनी सांगितले की त्यांना पत्नीच्या अवैध संबंधांबद्दल कळले तेव्हा पत्नीने त्यांच्यावर घरगुती हिंसाचार आणि छळाचा आरोप केला. पत्नीने आपल्याविरोधात खोटी पोलिस तक्रार दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला आणि पत्नीने भारताऐवजी अमेरिकेत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. प्रसन्ना म्हणाले की, त्यांच्या पत्नीने त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलाला अमेरिकेत लपवून ठेवले. या कारणास्तव त्यांनी पत्नीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि नंतर अमेरिकन न्यायालयाने प्रसन्ना यांच्या बाजूने निकाल दिला.टेक जायंट रिपलिंगचे सह-संस्थापक प्रसन्ना शंकर तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती म्हणून नावलौकाला आले आहेत. फोर्ब्सच्या अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे एक अब्ज डॉलर (९,००० कोटी रुपये) आहे, जी प्रामुख्याने रिपलिंगच्या सह-संस्थापकातून मिळाली आहे. रिपलिंग, दहा अब्ज डॉलर्सचा कार्यबल व्यवस्थापन प्लॅटफॉर्म आहे जो एचआर, आयटी, वित्त आणि इतर प्रमुख व्यवसाय कार्ये एकत्रित करतो.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.