भर चौकात तरुणाला संपवलं, आठवडाभरातील दुसरी घटना; हत्येच्या घटनेने लातूरमध्ये खळबळ.

लातूरमध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.लातूर शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. सोमवारी पहाटे राज्यस्थान विद्यालयाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या गाळ्याच्या पोर्चमध्ये एका तरुणाचा चेहरा दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. या घटनेने पुन्हा एकदा लातूरमध्ये खळबळ उडाली आहेमागील आठवड्यात भिक मागणाऱ्या एका व्यक्तीचा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोरच दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. आज राजस्थान विद्यालयाच्या शेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या एका गाळ्याच्या पोर्चमध्ये अक्षय तेलंगे या तरुणाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली आहे.

अक्षयचा चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला होता. अक्षय तेलंगे हा गुन्हेगार असल्याचं पोलिसांकडून समजतं आहे. त्याच्यावर चोरी, मारहाण आणि दरोडा यासारखे गंभीर गुन्हे जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये नोंद असल्याची माहिती आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा तपास शिवाजीनगर पोलीस पथक करत आहेत.लातूर शहरातील मध्यवर्ती भागात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या बाजूला एका भिकाऱ्याचा यापूर्वी दगडाने ठेचून खून करण्यात आला होता, ही घटना ताजी असतानाच आज, सोमवारी २४ मार्च रोजी राजस्थान विद्यालयाच्या शेजारी असलेल्या एका व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या समोर अक्षय तेलंगे नावाच्या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. लातूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे, चोरीच्या घटना, मारामारी, दरोडे अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.अक्षय तेलंगे हा गुन्हेगारी वृत्तीचा तरुण होता. आत्तापर्यंत अनेक पोलीस ठाण्यामध्ये अक्षयच्या विरोधात चोरी, मारहाण आणि दरोडा यासारखे गंभीर गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत. यातच काही वाद निर्माण झाला असावा आणि यामुळे अक्षयची हत्या केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं रवाना करण्यात आली आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.