पुणे पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटनेने हादरलं. एका आठ वर्षीय चिमुकलीवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली असून परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच पुण्यातील वाघोली परिसरात शाळेत निघालेल्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नराधमाने खाऊचं आमिष देऊन चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील वाघोली परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणात २७ वर्षीय आरोपीला वाघोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. स्वारगेट बस स्थानकात नुकत्याच झालेल्या धक्कादायक घटनेनंतर पुन्हा एकदा पुणे अत्याचाराच्या घटनेने हादरलं आहे.











