मनसेने दिले उत्तर महाराष्ट्र कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ येथील कुलगुरू यांना निवेदन.

प्रति,
मा.कुलगुरू सो.
कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
सस्नेह जय महाराष्ट्र

विषय:
1)विद्यापीठांमध्ये होणाऱ्या अधिसभेला विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची व सभेचे थेट प्रक्षेपण करण्याची परवानगी देण्याबाबत..
2) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी मुक्त शिक्षण विभाग सुरू करणे बाबत..

महोदय,
विद्यापीठांमध्ये होणाऱ्या अधिसभा (सिनेट मीटिंग) या शैक्षणिक व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असतात. या बैठकीत विद्यापीठाच्या कारभाराशी संबंधित विविध धोरणे, विद्यार्थ्यांशी निगडित निर्णय आणि प्रशासकीय बाबी निश्चित केल्या जातात. मात्र, या महत्त्वाच्या सभांना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध नाही.

लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आपल्या देशाने अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ
1. भारतीय संसद व विधानसभांचे कार्य थेट प्रक्षेपित होते: लोकसभा व राज्यसभेतील कामकाज देशभरातील नागरिकांना थेट पाहता येते. महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजासाठी प्रेक्षक गॅलरीची सोय देखील आहे, जिथे नागरिकांना थेट सभागृहातील चर्चा पाहता येते.2. न्यायालयीन प्रक्रिया देखील पारदर्शक केली जात आहे: सर्वोच्च न्यायालय आणि काही उच्च न्यायालये यांचे कामकाज आता थेट प्रक्षेपणाद्वारे (Live Streaming) नागरिकांना पाहण्याची संधी मिळत आहे. 3. स्थानीय स्वराज्य संस्था देखील पारदर्शकतेस प्राधान्य देतात: महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील नागरिकांना बैठकींना हजर राहण्याची परवानगी असते.या पार्श्वभूमीवर विद्यापीठांमध्ये देखील अधिसभा बैठकींसाठी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची व सभेचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही करीत आहोत. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव होईल व विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजाबाबत पारदर्शकता राहील. सिनेट सदस्य (अधीसभा सदस्य) विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे व किती प्रभावीपणे मांडतात, हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना समजू शकेल.विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवात होईल व भविष्यात जबाबदार नागरिक व सक्षम नेतृत्व घडेल.शासन आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात जबाबदारी आणि उत्तरदायित्वाची जाणीव वाढेल.

तरी, आपण मा. राज्यपाल महोदय, विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) व संबंधित शैक्षणिक संस्थांसोबत चर्चा करून विद्यापीठांमध्ये अधिसभा बैठकीसाठी विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची अधिकृत परवानगी द्यावी तसेच सभेचे थेट प्रक्षेपण करण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घ्यावा, अशी विनंती आहे. आपल्या सकारात्मक दखलीची अपेक्षा आहे.दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्वतंत्र मुक्त शिक्षण विभाग सुरू करावा अशी मागणी सुद्धा आम्ही करीत आहोत. सध्या अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आर्थिक परिस्थितीमुळे किंवा अन्य कौटुंबिक कारणांमुळे नियमित महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत नाहीत. मात्र, त्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी मुक्त शिक्षण हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) व इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांसारख्या संस्थांनी मुक्त शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.युजीसी (UGC) तर्फे ‘मुक्त शिक्षण अभियान’ प्रभावीपणे राबवले जात असून, त्याच धर्तीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्वतःचा स्वतंत्र मुक्त शिक्षण विभाग सुरू करावा, अशी आमची विनंती आहे.मुक्त शिक्षण विभाग सुरू करण्याचे शैक्षणिक महत्त्व:
घरबसल्या शिक्षणाची संधी: विद्यार्थी कोणत्याही ठिकाणी असो, ते घरबसल्या विविध विषयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतील.1. अर्थिक दृष्ट्या परवडणारे शिक्षण: फक्त प्रवेश शुल्क भरून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू शकेल.
2 स्वतंत्र अभ्यासक्रम व परीक्षा प्रणाली: विद्यापीठाने ऑनलाईन व ऑफलाईन अशा संमिश्र पद्धतीने अभ्यासक्रम राबवता येतील.
3. रोजगारसंधी वाढवण्यास मदत: मुक्त शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना काम करता करता शिक्षण घेता येईल, त्यामुळे त्यांचे करिअरच्या संधी वाढतील. 4. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग: डिजिटल साधनांचा उपयोग करून शिक्षण प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आम्ही विद्यापीठ प्रशासनास विनंती करतो की,विद्यापीठाने तत्काळ स्वतंत्र मुक्त शिक्षण विभाग स्थापन करावा.यासाठी अभ्यासक्रम विकसित करून त्याचे ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात अध्ययन उपलब्ध करून द्यावे व युजीसीच्या मार्गदर्शनाखाली या विभागाला मान्यता मिळवावी. विद्यापीठाने या मागणीवर सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.ॲड. जमील देशपांडेजिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव, उपशहर अध्यक्ष चेतन पवार,जनहित कक्षाचे राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेगडे, ललित शर्मा, जितेंद्र पाटील,विद्यार्थी सेनेचे चेतन पवार, भावेश पवार, उमेश कोळी.. उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.